शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यातील पंचबोल पॉइंटवर गारपीट, जिल्ह्यात विजांचा कडकडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

धारणी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासमार व खिडकी येथील चण्याचे उभे पीक जमीनदोस्त झाले. दोन्ही गावांत गारपीट झाली. चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथे बोराएवढी गार पडून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शहरातही अर्धा तास वादळी पाऊस कोसळला. काही घरांची टिनपत्रे उडाली. 

ठळक मुद्देसोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळला पाऊस, भाजीपाला पिकांचे नुकसान, सवंगणी केलेल्या हरभरा, गव्हाच्या पेढ्या झाल्या ओल्या, वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावर गुरुवारी दुपारी ४.३० वाजता अचानक अवकाळी पावसासह १० मिनिटांपर्यंत बोराच्या आकाराची गारपीट झाली. तालुक्यात काटकुंभ परिसरात तुरळक गारपीटसह पावसाने दमदार हजेरी लावली.ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता दोन दिवसांपासून वर्तविण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी ४ पासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. कवडाझिरी, काटकुंभ, कनेरी कोयलारी, गांगरखेडा, डोमा, बगदरी आदी परिसरातील गावांमध्ये तुरळक प्रमाणात गारपीट व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील गहू व इतर पालेभाज्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

धारणी, चांदूर रेल्वेत गारांचा पाऊसधारणी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासमार व खिडकी येथील चण्याचे उभे पीक जमीनदोस्त झाले. दोन्ही गावांत गारपीट झाली. चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा म्हाली येथे बोराएवढी गार पडून भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शहरातही अर्धा तास वादळी पाऊस कोसळला. काही घरांची टिनपत्रे उडाली. 

अवकाळीमुळे गारा वेचण्याची मौजचिखलदरा पर्यटनस्थळावरील पंचबोल पॉईंटवर दहा मिनिटापर्यंत चांगलीच गारपीट झाली. त्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये गारांचा खच जमला होता. यात पर्यटकांनी गारपिटीचा आनंद लुटला. गार वेचण्याची मौजदेखील येथे आलेल्या कुटुंबांनी लुटली.  सायंकाळी वृत्त लिहिस्तोवर सेमाडोह परिसरात पावसाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.

अमरावती, बडनेरा शहरात तुरळक पाऊसअमरावती, बडनेरा शहरात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडला. दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. वेधशाळेनेसुद्धा पावसाची शक्यता वर्तविली होती. शहर, ग्रामीण भागात हलका पाऊस पडला. अजुर्नगर ते पंचवटी चौकात हलका पाऊस कोसळला. बाजार समितीत धान्य झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. 

 

टॅग्स :Rainपाऊस