शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

रोग, कीडीसंदर्भात बांधावर कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

तालुक्यातील खमारी बुट्टी, बेलगाव, मंडनगाव, मांडवी येथील शेतकºयांना धान पिकावरील गादमाशी, खोडकिडा, कडाकरपा या रोग किडींची ओळख व त्यावरील उपायोजना संबंधी प्रात्यक्षिकातून माहिती दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील लागवड केलेल्या पट्टापद्धत, दोरीच्या साह्याने लागवड केलेली श्री पद्धत, जिओ-टॅगिंग, क्रॉपसॅप सर्वेक्षणाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देपिकांची पाहणी : फवारणीबाबत काळजी घ्या, कीड रोखण्यावर उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कधी संततधार पाऊस तर कधी ऊन पडत असल्यामुळे धान पिकावर विविध किड रोगांचा प्रादूर्भाव वाढत चालला आहे. यासाठी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तालुक्यातील विविध गावात भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान पिकावरील कीडरोग व्यवस्थापन व फवारणीबाबत मार्गदर्शन केले.
तालुक्यातील खमारी बुट्टी, बेलगाव, मंडनगाव, मांडवी येथील शेतकऱ्यांना धान पिकावरील गादमाशी, खोडकिडा, कडाकरपा या रोग किडींची ओळख व त्यावरील उपायोजना संबंधी प्रात्यक्षिकातून माहिती दिली. यावेळी त्यांनी तालुक्यातील लागवड केलेल्या पट्टापद्धत, दोरीच्या साह्याने लागवड केलेली श्री पद्धत, जिओ-टॅगिंग, क्रॉपसॅप सर्वेक्षणाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांच्यासोबत भंडारा मंडळ कृषी अधिकारी विजय हुमणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहाय्यक हेमा तिडके, कृषीमित्र नाशिक वडोळे, शेतकरी उपस्थित होते.
सध्या पिके समाधानकारक दिसत असली तरी सातत्याने वातावरण बदल होत असल्याने बारीक धानावर गादमाशी, खोडकिडा, पानावरील ठिपके, कडा करपाचा प्रादूर्भाव वाढत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या मार्गदर्शनात युरिया खताचा वापर टाळून व कोणती औषध फवारणी केली पाहिजे व पिकांची कशी काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भंडारा मंडळ अधिकारी विजय हुमणे यांनी शेतकºयांना दररोज सकाळी पिकांची नियमितपणे पाहणी करण्याचा सल्ला दिला.

अशी करावी तजवीज
धान पिकावर सातत्याने बदलणाºया वातावरणामुळे कडाकरपा खोडकिडा माशीचा प्रादूर्भाव काही ठिकाणी दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी कडा, करपा रोगासाठी स्टेप्टोसायक्लीन झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रती दहा लीटर पाण्यात, करपा रोगासाठी काबँन्डिझम ५० टक्के, गादमाशीसाठी फिप्रोनिल ०.३ टक्के २५ किलो प्रती हेक्टरी खोडकिडीसाठी कॉरटॉप हॉयड्रोक्लोराईड ५० टक्के, एएसपी १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी केले आहे.यावेळी पिकांच्या नुकसानीचा आढावाही घेण्यात आला.

टॅग्स :agricultureशेती