शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक व रोजगार सेवकाचा मनमानी कारभार

By admin | Updated: July 22, 2014 23:52 IST

पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या माडगी ग्रामपंचायत, ग्रामसेवक डी.डी. सार्वे व रोजगार सेवक श्रीधर करंडे हे विश्वासात न घेता कामे करीत असून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.

भंडारा : पंचायत समिती भंडारा अंतर्गत येणाऱ्या माडगी ग्रामपंचायत, ग्रामसेवक डी.डी. सार्वे व रोजगार सेवक श्रीधर करंडे हे विश्वासात न घेता कामे करीत असून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. रोहयोच्या कामातही त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.माडगी सरपंच यांनी निवेदनात म्हटले आहे की, माडगी येथे सन २०१२ पासून रोजगार हमी योजने अंतर्गत वनीकरणाचा माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली. याची कल्पना ग्रामसेवक सार्वे व रोजगार सेवक करंडे यांनी कुणालाही दिली नाही. तसेच याकरीता लागणाऱ्या मजूरांच्या मष्टरची व एमबीवर कोणत्याच प्रकारचे कामगारांची स्वाक्षरी घेतलेली नाही. कुठल्याही पद्धतीचे काम न करणाऱ्या मजुरांचेही रोजंदारीचे पैसे देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माडगी गावालगतचा जंगलाचा भाग नंबर २४५ मध्ये वनतलाव गट नंबर ४५२ असून याची आराजी दोन हेक्टर आहे. या तलावाचे खोलीकरणाचे काम मंजूर झाले. मात्र ग्रामसेवक व रोजगार सेवकांनी काम न करता फक्त कागदोपत्री त्याची नोंद करून शासनाकडून या कामाचा पैसा उचलला. व शासनाची दिशाभूल केली असून त्या कामाच्या मष्टरची चौकशी व्हावी, अशी त्यांनी या निवेदनातून मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)