शिक्षकांना लाभ द्या

By Admin | Updated: January 8, 2016 00:57 IST2016-01-08T00:57:17+5:302016-01-08T00:57:17+5:30

नगर परिषद व जिल्हा परिषद दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून शासन दरबारी गणल्या जात असल्या तरी ....

Give teachers the benefit | शिक्षकांना लाभ द्या

शिक्षकांना लाभ द्या

पवनी : नगर परिषद व जिल्हा परिषद दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून शासन दरबारी गणल्या जात असल्या तरी त्या संस्थाअंतर्गत कार्यरत शिक्षकांना शासनाकडून समान न्यायाची वागणूक व सोयीसवलती दिल्या जात नाही. नगर परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीसह अन्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी शिक्षकांनी लोकप्रतिनिधींना निवेदन देवून मागणी केलेली आहे. जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना कुटूंबासाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची सवलत देण्यात येते, रजा प्रवास सवलतीचा लाभ दिल्या जातो.
परंतु नगर परिषद अंतर्गत शाळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या कोणत्याही सोयी सवलतीचा लाभ दिल्या जात नाही. २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे डिसीपीस अंशदायी पेंशन योजना खाते उघडण्यात आलेले नाही. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांना पदोन्नती दिल्या जाते. मात्र नगर परिषद शिक्षक त्यापासून वंचित आहेत. सोयी सवलती नगरपरिषदेत कार्यरत शिक्षकांना लागू करण्यात याव्या अशी मागणी असलेले निवेदन आर.बी. बिलवणे, प्रा. येटे, एस.बी. मेश्राम, डी.एस. मेश्राम, गायकवाड, नवखरे, डांगे, साखरकर, हलमारे, सरवटकर, कापगते, कोल्हे यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Give teachers the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.