शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

या संदर्भात मुंबईस्थित राज्य निवडणूक आयोगात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणूक ...

या संदर्भात मुंबईस्थित राज्य निवडणूक आयोगात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

महाराष्ट्राच्या वरिष्ठ सदनात शिक्षक मतदारसंघातून सात सदस्य निवडून पाठविले जातात. मात्र, अनेक वर्षांपासून जुन्या शैक्षणिक धोरणानुसार केवळ माध्यमिक शिक्षकांपासून वरच्या वर्गातील सर्व शिक्षकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. यातून अनेक वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांना डावलण्यात येत आहे. राज्यघटनेच्या कलम ४५ मध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील शिक्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे. निवडणूक आयोग जुनीच री ओढत राज्यघटनेच्या कलम १७१ चा दाखला देत प्राथमिक शिक्षकांना पूर्व प्राथमिकमध्ये समाविष्ट करून प्राथमिक शिक्षकांना हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई कार्यालयात राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, उपमुख्य राज्य निवडणूक अधिकारी ए. एन. वळवी, * * * * * * * * * * *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागीय सचिव दिनेश गेटमे भंडारा, निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी गणेश कदम, संघटनेचे माध्यमिक संघटक बालकृष्ण राजुरकर यांच्यात झालेल्या बैठकीत * * * * * * * * * *विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरतर्फे शिक्षक निवडणुकीसंदर्भात आक्षेप नोंदविण्यात आला.

या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे यापूर्वी नागपूर विभागीय आयुक्तांमार्फत १५ ऑक्टोंबर २०१५ रोजी आक्षेप घेतला असल्याचे कळविले.

राज्य निवडणूक आयोगाने विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूरतर्फे उपस्थित करण्यात आलेले आक्षेप नोंदवून घेत यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी, दिल्ली येथे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शैक्षणिक आराखड्यात जो बदल झालेला आहे त्यावर शिक्षण विभागाकडून माहिती मागवून त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा प्राथमिक शिक्षकांच्या संवैधानिक हक्कासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी राज्य निवडणूक आयोगाला बैठकीत दिला.

कोट :

प्राथमिक शिक्षण हे शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा कणा आहे. मात्र, निवडणूक आयोग गत ५० वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांना मतदानाच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवत आहे. निवडणूक आयोगाने तत्काळ निर्णय घेत प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार द्यावा.

मिलिंद वानखेडे,

संस्थापक अध्यक्ष, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग