पोलीस बंदोबस्तात ढोक दाम्पत्यावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: September 1, 2016 00:44 IST2016-09-01T00:44:32+5:302016-09-01T00:44:32+5:30

जादुटोण्याच्या संशयावरून दावेझरी टोला येथे ढोक दांपत्याची निर्घृण हत्या झाली होती. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर दावेझरी येथे पोलीस बंदोबस्तात

The funeral procession was done by a police constable | पोलीस बंदोबस्तात ढोक दाम्पत्यावर अंत्यसंस्कार

पोलीस बंदोबस्तात ढोक दाम्पत्यावर अंत्यसंस्कार

दावेझरीकडे पाठ : महानिरीक्षकांनी केली चौकशी समिती गठित
तुमसर : जादुटोण्याच्या संशयावरून दावेझरी टोला येथे ढोक दांपत्याची निर्घृण हत्या झाली होती. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर दावेझरी येथे पोलीस बंदोबस्तात मंगळवारला सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत केवळ ढोक कुटुंबिय उपस्थित होते. पार्थिवासोबत यादवरावची दोन्ही मुले नागपूरहून आले. अंत्यसंस्कारानंतर दोघेही नागपुरला रवाना झाले. सध्या गावात सुरक्षेसाठी पोलीस नाही.
यादवराव ढोक व त्यांची पत्नी कौसल यांनी जादूटोणा केल्यामुळे एक महिला व बालकाचा मृत्यू झाला असा समज करुन ग्रामस्थांनी ढोक दाम्पत्याला बेदम मारहाण केली. त्यांची निर्घृण हत्या काही लोकांनी रविवारी केली होती. त्यानंतर त्यांचे मृतदेह जंगलात फेकून दिले होते. दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आल्यानंतर १२ आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. दावेझरी टोला येथे पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी भेट देऊन ढोक दांपत्याच्या घराचे निरीक्षण करून घटनास्थळाची पाहणी केली. मंगळवारला सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. आदिवासी कुटुंबातील दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. गावातील महिला व एका बालकाचा मृत्यू कशाने झाला. याचे कारण अनुत्तरीत आहे.
नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम यांनी बुधवारला तुमसर पोलीस ठाण्यात भेट देऊन खापा येथील दगडफेक आणि दावेझरी टोला येथील ढोक दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू सोबत होत्या. पोलीस अधिकाऱ्यांची बैठकीत जादूटोणा प्रकरण गंभीर व संवेदनशिल असल्याने तपासाकरिता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली. हे प्रकरण कसे हाताळावे याची माहिती पोलिस महानिरीक्षकांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The funeral procession was done by a police constable