शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळाला, पण मंजुरी अडली

By admin | Updated: November 18, 2014 22:48 IST

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भिमलकसा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी १० कोटी रूपयांचा निधी संबंधित विभागाला मिळाला. परंतु केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने निधी

भिमलकसा प्रकल्प : राज्य शासनाने मागितली केंद्र शासनाकडे परवानगीसंजय साठवणे - साकोलीतालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या भिमलकसा प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी १० कोटी रूपयांचा निधी संबंधित विभागाला मिळाला. परंतु केंद्र शासनाची अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने निधी असूनही कामाला सुरूवात झालेली नाही.मागील चार दशकापासून प्रलंबित असलेल्या भिमलकसा सिंचन प्रकल्पासाठी आडकाठी ठरलेल्या वनजमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. यासाठी राज्याच्या महसूल आणि वनविभागाने या प्रकल्पासाठी ११६.०३ हेक्टर वनजमिन हस्तांतरणाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यासाठी आवश्यक ती औपचारिकता पूर्ण होताच वन विभागाकडून ही जमीन प्रकल्पगासाठी देण्यात येणार आहे.शासनाने या प्रकल्पासाठी १० कोटी रुपये दिले आहे. मात्र केंद्र शासनाकडून या प्रकल्पाला अंतीम मान्यता मिळाली नसल्याने या प्रकल्पाचे काम अजूनपर्यंत सुरुच झाले नाही. त्यामुळे परिसरातील शेती सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही. दि. १३ आॅगस्ट रोजी राज्य सरकारच्या महसूल व वनविभाग सचिव पी.सी. मयेकर यांनी केंद्रीय पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे सचिवांना पत्र पाठविले होते. त्या पत्रानुसार प्रकल्पासाठी वनजमीन हस्तांरणासंबंधी प्रस्तावाला केंद्र सरकारने सैद्धांतीक मंजूरी दिली होती. यात प्रकल्पाला वनजमीन हस्तांतणासोबत राज्य सरकाला वनजमीन नसलेली वैकल्पीक वनीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची आणि त्यासाठी आवश्यक रक्कम वसुल करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार भंडाऱ्याचे उपवनसंरक्षकांनी २३२.०६ हेक्टर झुडपी जंगलाची जागा उपलब्ध करून दिली होती आणि राज्यांच्या सिंचन विभागाने एनपीव्ही (नेट प्रेझेंट व्हॅलू) सुमारे १५ कोटी रुपये वनविभागाला दिले होते. एकंदरीत या वनप्रकल्पाला अडथळा निर्माण करणारी वनजमिनीचा प्रश्न सुटला व राज्य शासनाने १० कोटी रुपयेही या प्रकल्पासाठी दिले आहेत.