अंधाऱ्या गल्ल्या आणि नवीन वसाहतीत ठिय्यालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील सुनसान रस्त्यावरील अंधारे कोपरे प्रेमीजीवांच्या आवडीचे ठिकाण झाले आहेत. तोंडाला स्कार्फ बांधलेले तरुण - तरुणी अशा सुनसान रस्त्यावर रात्री - बेरात्री प्रेमालाप करताना दिसतात. शहरातीलच नव्हे तर शहरालगतच्या नवीन वसाहतीतही प्रेमीजीवांचा खुलेआम संचार असतो. त्यांना कुणी हटकले तर आपल्या वाहनाला किक मारतात आणि निघून जातात.भंडारा शहर शांत आणि ग्रामीण वळणाचे आहे. मात्र अलिकडच्या काही दिवसात शहरातील काही रस्ते नाहक बदनाम होत आहेत. खामतलाव परिसरातून एमएसईबी कॉलनीकडे जाणाºया रस्त्यावर रात्री ९ ते १० च्या दरम्यान हमखास प्रेमीजीव वार्तालाप करताना दिसून येतात. महाविद्यालयीन परिसराच्या मागच्या बाजूला असलेल्या झुडुपांमध्येही भर दिवसा राघू मैनेची जोडी बसलेली असते. अनेकदा तर या परिसरात नको त्या वस्तू पडलेल्या आढळून येतात. त्यावरून या परिसरात वार्तालापच नव्हे तर बरेच काही सुरु असल्याचे लक्षात येते. यासोबतच शहरातील निर्माणाधिन वसाहती सध्या प्रेमीजीवांसाठी अतिशय प्रिय झाल्या आहेत. दुपारच्या वेळी या परिसरात कुणीही नसते. तापत्या उन्हात तर हा परिसर निर्मनुष्य असतो. उन्हातान्हाची पर्वा न करता प्रेमीजीव या ठिकाणी एकत्र येतात. भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगेच्या तिरावरील कोरंभी परिसरात तर जणू प्रेमीजीवांचे संमेलन भरल्याचा भास होतो. रावणवाडी तलावाकडे जाणारा रस्ताही अशा गर्दीने फुललेला असतो. तोंडाला स्कार्फ असल्याने वडीलांनाही आपल्या मुलाला आणि मुलीला ओळखणे कठीण होते. नैतिकतेची पातळीच खालावली.दामिनी पथक अशा प्रेमीजीवांना वठणीवर आणण्याचे काम करते. जिल्हा पोलीस दलाने या पथकाची निर्मिती केली आहे. मात्र या पथकाचे लक्ष पर्यटनस्थळावरील प्रेमी युगुलांकडे असते. शहरातील गल्ल्यांमध्ये रात्रीच्या वेळी गस्त घातल्यास अशा प्रकाराला आळा घालता येऊ शकतो. सामाजिक स्वास्थ बिघडविण्यावर अंकुश मात्र कुणाचही दिसत नाही
भंडाऱ्यातील सुनसान रस्त्यांवर प्रेमीजीवांचा सुरू असतो प्रेमालाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:43 IST
शहरातील सुनसान रस्त्यावरील अंधारे कोपरे प्रेमीजीवांच्या आवडीचे ठिकाण झाले आहेत. तोंडाला स्कार्फ बांधलेले तरुण - तरुणी अशा सुनसान रस्त्यावर रात्री - बेरात्री प्रेमालाप करताना दिसतात. शहरातीलच नव्हे तर शहरालगतच्या नवीन वसाहतीतही प्रेमीजीवांचा खुलेआम संचार असतो.
भंडाऱ्यातील सुनसान रस्त्यांवर प्रेमीजीवांचा सुरू असतो प्रेमालाप
ठळक मुद्देतोंडाला स्कार्फ बांधल्याने ओळख कठीण।