मोहाडी पंचायत समितीत मद्यपी कर्मचाऱ्यांत फ्री स्टॉईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:30+5:30

मोहाडी पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गाव खेड्यातून कामाच्या निमित्ताने अनेक जण आले होते. दुपारच्या वेळी तीन कर्मचारी मद्य प्राशन करून आवारात गोंधळ घालत होते. काही वेळातच यात हाथापायी होवून मारामारी सुरू झाली. यात मनरेगा विभागातील एक, बीपीएल टेबल सांभाळणारा एक कर्मचारी आणि एका शिपायाचा समावेश होता.

Free style among alcoholics in Mohadi Panchayat Samiti | मोहाडी पंचायत समितीत मद्यपी कर्मचाऱ्यांत फ्री स्टॉईल

मोहाडी पंचायत समितीत मद्यपी कर्मचाऱ्यांत फ्री स्टॉईल

Next
ठळक मुद्देबघ्यांची जमली होती मोठी गर्दी । कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : पंचायतराज व्यवस्थेतील महत्वाचा दूवा असलेल्या मोहाडी पंचायत समितीचा कारभार चांगलाच ढेपाळला असून शुक्रवारी तर पंचायत समितीच्या आवारातच मद्यपी तीन कर्मचाऱ्यात फ्री स्टॉईल झाली. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. परंतु अद्यापर्यंत यासंदर्भात कुणीही तक्रार केली नाही. परंतु पंचायत समितीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
मोहाडी पंचायत समितीत ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गाव खेड्यातून कामाच्या निमित्ताने अनेक जण आले होते. दुपारच्या वेळी तीन कर्मचारी मद्य प्राशन करून आवारात गोंधळ घालत होते. काही वेळातच यात हाथापायी होवून मारामारी सुरू झाली. यात मनरेगा विभागातील एक, बीपीएल टेबल सांभाळणारा एक कर्मचारी आणि एका शिपायाचा समावेश होता. अश्लिल शिवीगाळ करत सार्वजनिकरित्या गोंधळ सुरू होता. याठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी तर शरमेने मान खाली घातली. गट विकास अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे.
मोहाडी पंचायत समितीत काही कर्मचारी दारूच्या नशेत असतात. सध्या पंचायत समितीवर प्रशासक असल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचेही वेळेवर काम होत नाही.

मोहाडी पंचायत समितीत काही दारूडे कर्मचारी प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. येथे येणाºया गावकºयांशी नेहमी हुज्जत घालतात. कार्यालयात कमी आणि टपरीवर अधिक वेळ बसून असतात. या कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबत वाढत आहे. शुक्रवारी झालेल्या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांना विचारणा केली त्यावेळी या प्रकरणाबाबत काही माहिती हवी असल्यास सोमवारी कार्यालयात प्रत्यक्ष भेटा. मी मोबाईवर माहिती देणार नाही, असे सांगितले.

Web Title: Free style among alcoholics in Mohadi Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.