शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:17 IST

साकोली वनविभागा अंतर्गत येणाºया सानगडी पश्चिम सहवनपरिक्षेत्रातील पापडा (खुर्द) शिवारात दोन दिवसापूर्वी शिकाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या सहायाने एका चितळाची शिकार केली.

ठळक मुद्देशिकार प्रकरण : चितळाचे मुंडके व पायाचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली वनविभागा अंतर्गत येणाºया सानगडी पश्चिम सहवनपरिक्षेत्रातील पापडा (खुर्द) शिवारात दोन दिवसापूर्वी शिकाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या सहायाने एका चितळाची शिकार केली. याप्रकरणी वनविभागाने चार शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून चितळाचे मुंडके, पाय, शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य अजूनपर्यंत हस्तगत करण्यात आले नाही.राजकुमार रामा लांजेवार, राजु कारू सिडाम, रतीराम बळीराम ईस्कापे व बळीराम ऋषी सयाम चौघेही रा.पापडा (खुर्द) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पापडा खुर्द शिवारात २३ नोव्हेंबरला शिकाऱ्यांनी विद्युत प्रवाह लावून एका चितळाची शिकार केली होती. शिकारीनंतर मृत चितळाचे मांस घटनास्थळावर कापत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. वनअधिकारी येणार असल्याचा सुगावा लागताच शिकारी चितळाचे मुंडके व चार पाय घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून चितळाचे मांस सानगडी वनपिरक्षेत्रात आणले. त्यानंतर शवविच्छेदन करून संपूर्ण मांस जाळले. तीन दिवसानंतर वनविभागाला आरोपी सापडले. आरोपीच्या शोधासाठी साकोलीचे क्षेत्र सहायक धोटे, सानगडीचे क्षेत्र सहायक तांडेकर, वनरक्षक बोपचे, वनरक्षक घुगे, वनरक्षक ठोके वनरक्षक डोरले आदी सापळा रचून शिकाºयांना ताब्यात घेतले.डोके व साहित्ये मिळाले नाहीवनविभागाला शिकारी सापडले असले तरी या शिकारीत वापरण्यात आलेले साहित्य, चितळाचे डोके व पाय अद्याप सापडले नाही.शिकार प्रकरणाचा तपास सुरू असून आज चार आरोपी सापडले. त्यांची कसून चौकशी करणे सुरू आहे. या शिकारीत वापरलेली साहित्य लवकरच जप्त करण्यात येईल.- आरती उके,वनक्षेत्राधिकारी साकोली.