भारतीय बौद्ध महासभेचे गठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:42+5:302021-02-05T08:41:42+5:30

भंडारा : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकरप्रणीत भारतीय बौद्ध महासभा समितीचे गठण शासकीय विश्रामगृह भंडारा येथे ...

Formation of the Indian Buddhist Congress | भारतीय बौद्ध महासभेचे गठण

भारतीय बौद्ध महासभेचे गठण

भंडारा : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकरप्रणीत भारतीय बौद्ध महासभा समितीचे गठण शासकीय विश्रामगृह भंडारा येथे २४ जानेवारी रोजी आयोजित सभेत करण्यात आले. याप्रसंगी भंते नागा प्रकाश यांच्या अध्यक्षतेत प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र वहाने ,जिल्हा प्रभारी राजेश बौद्ध तसेच बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

यात अध्यक्षपदी इंजि.रुपचंद रामटेके. उपाध्यक्ष हेमा गजभिये, महासचिव प्रा.युवराज खोब्रागडे, सचिव अरविंद धारगावे, संघटक उमेश मेश्राम, सहसंघटक शीलकुमार वैद्य, संस्कारप्रमुख पुरुषोत्तम शहारे, कोषाध्यक्ष भारत गोंडाने, प्रवक्ता अशोक काणेकर, सदस्य कल्पना ढोके, राजश्री लोखंडे, बिंदुसार गडपायले,अरविंद रामटेके, राजेश नंदागवळी,रत्नघोष बंसोड, संजीव भांबोरे,दीपक पाटील,चंद्रशेखर मेश्राम,राजकपूर पाटील,उमेश गजभिये, कुंजन शेंडे आदी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

महासभेला भंते नागा प्रकाश, सुरेंद्र वहाने, इंजि.रुपचंद रामटेके, राजेश बौद्ध यांनी संबोधित केले. यावेळी बौद्ध धम्माच्या तत्त्वप्रणाली व सम्यक विचारसरणीचा प्रचार- प्रसार करण्याचा कृतीसंकल्प करण्यात आला. कार्यक्रमासाठी दीपक देशभ्रतार, किशोर बौद्ध, हिरोज राऊत, भीमराव बागडे, अंकेश देशपांडे, अनिल बौद्ध, राहुल बौद्ध, मनोज बौद्ध, विलास मेश्राम, सुरेश टेंभुर्ण ,रवि लोखंडे,महेंद्र मेश्राम,सिध्दार्थ गजभिये, विवेक बौद्ध यांनी सहयोग प्रदान केले. बौद्ध महासभेचे सूत्रसंचालन प्रा.युवराज खोब्रागडे, प्रास्ताविक राजेश बौद्ध तर शीलकुमार वैद्य यांनी आभार मानले.

Web Title: Formation of the Indian Buddhist Congress