शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बळजबरीने मतदानासाठी पोलीस पाटलाला भाग पाडले

By admin | Updated: October 15, 2014 23:14 IST

विधानसभा मतदारसंघातील सुुसरडोह येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान येथील पोलीस पाटील हरिप्रसाद खंडाते (६०) यांना शासकीय कर्मचाऱ्यांनी बळजबरीने मतदान करण्यासाठी भाग पाडले,

तुमसर : विधानसभा मतदारसंघातील सुुसरडोह येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान येथील पोलीस पाटील हरिप्रसाद खंडाते (६०) यांना शासकीय कर्मचाऱ्यांनी बळजबरीने मतदान करण्यासाठी भाग पाडले, असा आरोप सरपंच किशोर उईके यांनी केला आहे. पोलीस पाटील शासनाचे प्रतिनिधी असले तरी ते गावातील सन्मानीय नागरिक आहेत. त्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने अशी बळजबरी करणे योग्य नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच किशोर उईके यांनी केली आहे.तुमसर विधानसभा मतदार संघातील १३ उमेदवारांचे भाग्य बुधवारी सायंकाळी ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. उमेदवार व समर्थकांच्या अंकगणितांना पूर्णविराम मिळाला असून १९ आॅक्टोबर रोजी १३ व्या विधानसभेचा सदस्य कोण होणार? हे निश्चित होईल. दरम्यान सुसुरडोह येथील मतदान केंद्रावर शासकीय कर्मचाऱ्यांनी दबाव टाकून पोलीस पाटलांना मतदान करावयास भाग पाडले.तुमसर विधानसभा मतदारसंघात सुरूवातीपासून बहुरंगी लढत होती. एकूण मतदानाची टक्केवारी बघता तुमसर शहरात सरासरी ६० टक्के मतदान झाले. उर्वरीत क्षेत्रात ६८ ते ७० टक्के मतदान झाले. तुमसर शहरात सकाळपासून दुकाने बंद होती. दुपारनंतर हळूहळू सुरुझाली. प्रथमच संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. सकाळी दहा वाजतानंतर पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यामुळे मतदानाची गती संथ पडली. दुपारपर्यंत मतदार वाढले परंतु शहरातील मतदारांमध्ये उत्साह दिसला नाही.काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मागील १५ दिवसापासून मतदारसंघ पिंजून काढला. मतदार शेवटपर्यंत बोलला नाही. रुसवे फुगवे चालले. त्यानंतर पदाधिकारी प्रचाराला लागले. युती व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विभागले गेले. सोबत राहणारे १५ दिवसात दूर झाले. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच जात फॅक्टर महत्त्वाचा ठरला. शेवटच्या दोन दिवसात तो गौण दिसला.पट्टीचा कार्यकर्ता तथा जवळचा असे समीकरण तयार झाले. व्यक्तीमत्वाला सुद्धा येथे महत्व प्राप्त झाले होते. एरव्ही मतदारांकरिता चारचाकी वाहने धावताना दिसत होत्या. त्या या निवडणुकीत दिसल्या नाहीत. महिला मतदारात उत्साह दिसला. शहरातील खापा टोली परिसरातील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)