शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लाभासाठी निराधारांची पायपीट

By admin | Updated: April 24, 2017 00:58 IST

पवनी तालुक्यात हजारो लाभार्थी शासनाच्या निराधारासाठी असलेल्या योजनांचे लाभार्थी आहेत.

सर्व काही मानधनासाठी : आधारकार्डच्या लिंकिंगमुळे बोगस लाभार्थ्यांची पोलखोलचिचाळ : पवनी तालुक्यात हजारो लाभार्थी शासनाच्या निराधारासाठी असलेल्या योजनांचे लाभार्थी आहेत. परंतु या योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या चार- पाच महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांना तहसिल कार्यालय तसेच बँकेत चकरा मारुन थकले असल्याने हजारो लाभार्थी चालकासारखी मानधनाची वाट पाहत आहेत. शासनाने निराधाराची होत असलेली पिळवणूक त्वरित थांबवावी अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत समाजातील निराधार वृध्दासाठी श्रावणबाळ योजना तर परितक्ता विधवा अपंग दुर्धर आजारी वैगेरे स्त्री-पुरुषासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यात श्रावणबाळ व संजय गांधी या योजना राज्यशासनाच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना या केंद्र सरकारच्या आहेत. दोन्ही सरकारच्या मिळून या चारही योजनेचे अनुदान न मिळाल्याने रोज बँकेत व तहसिल कार्यालयात चकरा मारुन थकले आहेत. शेकडो लाभार्थ्यांनी अनेकदा तक्रारी प्रतिनिधीकडे मांडतात केंद्र व राज्य शासनाने सर्व योजनासाठी आॅनलाईन प्रणाली लागू केली असून तयात वारवार होणाऱ्या बिघाडामुळे तालुक्यात शेकडो लोकांना अनुदान न मिळाल्यान ते त्रस्त आहेत.सर्व लाभार्थ्यांना डाटा अपडेट करणे सुरु असुन अनेकवेळा मागणी करुन सुध्दा शेकडो लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड सादर न केल्यामुळे तसेच शासनाने प्रत्येक योजनेसाठी आधारकार्ड आवश्यक केल्यामुळे आधारकार्ड सादर न केल्यास लाभार्थ्यांच्या खाते क्रमांक आधार कार्डसोबत लिंक झाली नाही तर अनेक लोकांकडे आदेशपत्र नाही त्यामुळे सदर व्यक्ती कोणत्याच योजनाचा लाभ घेतो हे कळत नाही. तसेच शेकडो जणांनी पती-पत्नी, मुलगा आई सासु सासरे संयुक्त खाते पुस्तक क्रमांक दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार फक्त अठरा वर्षाखालील निराधारासाठी संयुक्त खातेपुस्तक चालते इतरांसाठी नाही. त्याशिवाय एकच व्यक्ती दोन योजनांचा लाभार्थी लाभ घेत असल्याची बाब सुध्दा आधारकार्डमुळे उघडकीला येत असतात.अनुदानाची चौकशी करणाऱ्या व्यकत्ीने सोबत आदेशपत्र आधारकार्ड व नोंदणी केलेले खातेपुस्तक आणावे अशा सुचना देऊनसुध्दा लोक केवळ खाते पुस्तक घेवून येतात नविन लाभार्थ्यानी जे खाते पुस्तक दिले. त्यावर अनुदान पाठविले असता सदर खाते पुस्तक बंद असल्यामुळे अनुदान परत येते म्हणून नविन लाभार्थ्यांची सुरु असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचाच खाते क्रमांक घ्यावा असे आवाहन करण्यात येतात. जनतेच्या प्रश्नाची उत्तरे देताना या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत असून लाभार्थ्यांनी प्रशासनास सहकार्य केल्यास लवकरच सर्व तक्रारी दूर होवून पात्र लाभार्थ्यांना नियमित अनुदान मिळेल, असे सांगण्यात येते. (वार्ताहर)पोस्टातच मानधन द्याग्रामीण लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या डाक कार्यालयातून वृध्दांना मानधन मिळत आहे. त्यामुळे त्यांना १० ते १५ किमी हा त्रास होत नाही. मात्र आता त्या वृध्दांना तुमचे खाती राष्ट्रीय बँकेला जोडण्याचे संबंधीताकडून बोलले जात असल्याने ग्रामीण वृध्दांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ते मानधन पोस्टातूनच देण्यात यावे अशी मागणी होत आहे.