भंडारा : जिल्ह्यातील अनेक अनेक भागांना सुसाट वाऱ्याचा तडाखा बसला आहे. यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात सायंकाळी ५. ३० वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्याने अनेकांची तारांबळ उडाली. या वाऱ्यामुळे यामुळे शहरातील अनेक भागांतील वृक्षांचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली नसली तरी पत्रे मात्र उडून गेले. विद्युत पुरवठाही खंडित झाला. दाट काळ्या ढगांची दाटी करत हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज सायंकाळी मात्र आपला धुंवाधारपणा दाखवत अक्षरश: जनजीवन विस्कळीत केले. शहर परिसरात काळ्या ढगांनी आच्छादन केल्याने अंधार पसरला होता.दिवसेंदिवस वाढणारी उन्हाळ्याची तीव्रता अंगाची लाहीलाही करत असतानाच आलेल्या या सुसाट वाऱ्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी जाणवली. (नगर प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}