महाराष्ट्र दिनी फडकला विदर्भाचा ध्वज

By Admin | Updated: May 2, 2015 00:43 IST2015-05-02T00:43:56+5:302015-05-02T00:43:56+5:30

विदर्भ राज्य स्थापन केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार करुन ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने शुक्रवारला ..

Flag of Vidarbha on the occasion of Maharashtra Day | महाराष्ट्र दिनी फडकला विदर्भाचा ध्वज

महाराष्ट्र दिनी फडकला विदर्भाचा ध्वज

भंडारा : विदर्भ राज्य स्थापन केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार करुन ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने शुक्रवारला सकाळी ९ वाजता रुक्मिणी नगरच्या मैदानावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहण जोशी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.
विदर्भ राज्याच्या आंदोलनात जनतेचा सहभाग मिळविण्यासाठी १ मे रोजी विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये सकाळी ९ वाजता एकाचवेळेस ध्वजारोहण करण्यात आले. विदर्भ आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम आहे, विदर्भ आंदोलनाच्या झेंड्यातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी मुरलीधर साखरकर, मिश्रा गुरुजी उपस्थित होते. संचालन विदर्भ कनेक्टचे अ‍ॅड.मृणाल बांडेबुचे यांनी केले. यावेळी रुख्मिणी नगरातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासह टेनिकाईट संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Flag of Vidarbha on the occasion of Maharashtra Day