गुणवंत विद्यार्थ्यांनी केले ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:35+5:302021-02-05T08:41:35+5:30

पालोरा (चौ) : गणराज्य दिनानिमित्ताने पालोरा येथे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना ध्वजारोहण करण्याचा मान गुणवंत विद्यार्थ्याला देण्यात ...

Flag hoisting by meritorious students | गुणवंत विद्यार्थ्यांनी केले ध्वजारोहण

गुणवंत विद्यार्थ्यांनी केले ध्वजारोहण

पालोरा (चौ) : गणराज्य दिनानिमित्ताने पालोरा येथे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना ध्वजारोहण करण्याचा मान गुणवंत विद्यार्थ्याला देण्यात आला. तसेच सत्कारही करण्यात आला. सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहणाचा मान श्वेता राजेश काजरखाने हिला मिळाला. आंबेडकर वार्ड येथील ध्वजारोहणाचा मान गौरव हटवार याला मिळाला. ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच अनिता संदीप गिऱ्हेपुंजे यांनी केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला. यात श्वेता काजरखाने, गौरव हटवार, आचल गिऱ्हेपुंजे व दुर्गा कावळे यांचा शाल श्रीफळ देऊन सरपंच अनिता गिऱ्हेपुजे यांनी सत्कार केला. यावेळी पो.पा.श्रीहरी गिऱ्हेपुंजे, पुरुषोत्तम गिऱ्हेपुंजे, उपसरपंच दुर्गा कावळे, सुनीता मस्के, रविता धारगावे, उषा काजरखाणे, ताराचंद गिऱ्हेपुंजे, ग्रामसेवक एच. एस.लंजे, यशवंतराव कावळे, मुख्याध्यापक पडोळे,वसंतराव फुंडे ,गणपत गिऱ्हेपुंजे, मनोज धाबेकर. वासनिक, हरिदास सुपारे, गजानन जुंमळे उपस्थित होते.

Web Title: Flag hoisting by meritorious students