शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाच वर्षांची शिक्षा

By admin | Updated: November 2, 2014 22:28 IST

ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपीक व सहाय्यक लिपीक यांनी बनावट पावती बुक छापून १ लाख ४५,६४१ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी ग्रामपंचायतच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले.

वरठी : ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपीक व सहाय्यक लिपीक यांनी बनावट पावती बुक छापून १ लाख ४५,६४१ रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी ग्रामपंचायतच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात वर्ग झाले. २८ आॅक्टोबरला अंतिम सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपी घनश्याम बोंदरे व धनलाल मेश्राम यांना पाच वर्षाचा सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. वरठी ग्रामपंचायत येथे घनश्याम गंगाराम बोंदरे हे वरिष्ठ लिपीक व धनलाल नत्थू मेश्राम हे सहाय्यक लिपीक म्हणून कार्यरत होते. दोघांकडे गावातून जमा होणारे पाणीपट्टी व घरकर वसूल करून पावती देण्याचे अधिकार होते. याचा गैरफायदा घेत दोघांनीही ग्रामपंचायतीच्या नावाचे बनावट पावती बुक तयार केले. त्यातून १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००३ या काळात गृहकर व पाणीपट्टी कर जमा करणाऱ्यांना बनावट पावती देण्यात आले. प्रत्यक्षात जमा झालेले कर आणि त्यांच्या नोंदीत तफावत होती व पावतीचा नोंदवहीत क्रमांकही वेगळा होता.पैसे भरूनही ग्रामपंचायतने मागणी बिलात भरलेले पैसे लागून आल्यामुळे काही जणांनी ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या. तत्कालीन सरपंच दिलीप उके यांनी तक्रारीची दखल घेवून ग्रामपंचायतमार्फत स्पेशल आॅडीट करून अनेक दिवसांपासून सुरु असलेला गोरखधंदा उघडकीस आणला. यासंदर्भात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर डोमळे यांनी पोलिसात २००४ मध्ये तक्रार दिली. त्यानुसार वरठी पोलिसांनी भादंवि ४२०, ४०८, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. सदर प्रकरण २००४ पासून न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान बोगस पावती प्रकरणात अनेक दस्तऐवजाची तपासणीसह हस्ताक्षर अहवाल मागविण्यात आले होते. याकरिता त्यावेळेचे सरपंच दिलीप उके, ग्रा.वि.अधिकारी मुनेश्वर तुरकर, लेखा परीक्षक यांच्यासह सात लोकांची साक्ष नोंदविण्यात आली. २८ आॅक्टोबरला झालेल्या सुनावणीदरम्यान घनश्याम बोंदरे व धनलाल मेश्राम यांना न्यायालयाने भादंवि ४०८ आर.डब्लू ३४ अंतर्गत पाच वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि भादंवि ४२० आर.डब्लू.३४ अन्वये पाच वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यानंतर दोघांचीही कारागृहात रवानगी करण्यात आली. ग्रामपंचायतच्यावतीने सरकारी वकील बी.एस. तामगाडगे यांनी बाजू मांडली. (वार्ताहर)