शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत १४८ अर्भक मृत्यू

By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST

गर्भवती मातांची अंगणवाडी केंद्रात नोंद करून जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातांना सकस आहार दिला जातो. गर्भवती मातांना गर्भावस्थेत घ्यावयाच्या काळजी याबाबत माहिती दिली जाते.

आरोग्य यंत्रणा खिळखिळी : २५ बालकांसह सहा मातांचा मृत्यू प्रशांत देसाई - भंडारागर्भवती मातांची अंगणवाडी केंद्रात नोंद करून जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातांना सकस आहार दिला जातो. गर्भवती मातांना गर्भावस्थेत घ्यावयाच्या काळजी याबाबत माहिती दिली जाते. यावर शासनाच्या वतीने लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी भंडारा जिल्ह्यात पाच महिन्यात १४८ अर्भक मृत्यू झाले आहे. तर २५ बालमृत्यू असून ६ मातामृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.शासनाकडून गर्भवती महिला व बालकांवर लाखोंचा खर्च करण्यात येत असला तरी भंडारा जिल्ह्यात याची अंमलबजावणी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडल्याचे दिसून येत आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात १४८ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. तर १ ते ५ वयोगटातील २५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून याच कालावधीत सहा मातांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आरोग्य विभागाच्या वतीने गर्भवती माता व बालकांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. मात्र आरोग्य विभागाची यंत्रणा योजना चांगल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्या आहेत. गर्भवती मातांना गर्भावस्थेत शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या योजना व सकस आहार अंगणवाडी केंद्रातून दिल्या जाते. याचा लाभ घेण्याकरिता गर्भवती महिलेची अंगणवाडी केंद्रात नोंद करणे गरजेचे आहे. त्यांनतर गर्भवती महिलेला माता व बाल संगोपन करण्यासंबधीत माहिती अंगणवाडी केंद्रातील सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून दिली जाते. अंगणवाडीतून गर्भवती महिलेला जीवनसत्वयुक्त सकस आहार मोफत दिल्या जाते. तिचे दर महिन्याला अंगणवाडी केंद्रात वजन केल्या जाते. मानव विकास योजनेंतर्गत गर्भवती महिलेला आठव्या महिन्यात दोन हजार रूपये दिल्या जाते. प्रसुतीनंतर दोन हजार असे चार हजार रूपये शासनाकडून दिल्या जाते. यासोबतच जननी सुरक्षा योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व बीपीएल प्रवर्गातील महिलांना प्रसूतीनंतर सातशे रूपये देण्यात येते. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांना घरून दवाखान्यापर्यंत व प्रसुतीनंतर दवाखान्यातून घरी पोहचविण्याची मोफत सुविधा आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. ग्रामीण जनतेची नाळ जुडून असलेल्या शासकीय रूग्णालयात सुविधा नसल्या तरी अनेकांची प्रथम पसंती याच रूग्णालयाला आहे. सात तालुक्याच्या भंडारा जिल्हा मुख्यालयी जिल्हा सामान्य रूग्णालयाची निर्मिती केली आहे. पाच महिन्यात जिल्ह्यात मृत्यूने तांडव घातल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.