शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

धान पट्ट्यातील भंडारा जिल्ह्याचा रबी पीक विम्यात यंदा पहिल्यांदाच समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही.

ठळक मुद्दे६३ शेतकऱ्यांनी काढला विमा : खरीपातील अनुभवाने शेतकऱ्यांची पाठ

  संताेष जाधवर    लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याचा यंदा पहिल्यांदाच रबी पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विमा काढला जातो. यंदाच्या खरीपात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र मोठे नुकसान होवूनही अत्यल्प शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ झाला. खरीपाचा अनुभव गाठीशी असल्याने रबी पीक विमा काढण्यास शेतकरी अनुस्तुक दिसत आहे. पीक विमा भरण्याची अंतिम तिथी तीन दिवसावर असताना केवळ ६३ शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. परंतु रबी हंगामात गहू, हरभरा आणि लाखोळीची लागवड केली जाते. परंतु आतापर्यंत त्याला पीक विम्याचा लाभ मिळत नव्हता. परंतु यंदा त्याचा समावेश झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु आतापर्यंत खरीप हंगामातील विमा कंपन्यांचा अनुभव बघता शेतकरी फारसे उत्सूक दिसत नाही. पदरमोड करून विमा हप्ता भरता तेवढेही पैसे परत मिळत नसतील तर विमा काढायचा तरी कशाला, असा सवाल केला जातो. पीक विम्याकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.

खरीप नुकसानीचे अनुदानभंडारा जिलह्यात अतिवृष्टी आणि महापुराने धान पिकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ६५४ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टीत आणि महापूरात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे  शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत.

विमा काढणार नाहीखरीप हंगामात मी धान पिकाचा विमा उतरविला होता. अतिवृष्टी आणि त्यानंतर तुडतुडा पिकाने प्रचंड नुकसान झाले. मात्र विमा कंपनीकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दरवर्षी खरीप पीक विमा भरतो. मात्र मदत मिळत नसल्याने रबी पिकांचा पीक विमा उतरविणार नाही. तसेही रबीत नुकसान कमी होते. - सुरेश गिरेपुंजे, खरबी नाका.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा