कॅनरा बँकेत पहाटेच्या सुमारास आग, अग्निशमनची गाडी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:36 AM2021-05-06T06:36:28+5:302021-05-06T06:44:13+5:30

अग्निशामक दलाच्या जवानांनी बँकेच्या खिडकीच्या काचा फोडून आत पाणी मारण्याचा प्रयत्न केला. धुरामुळे आत प्रवेश करण्यास अडचण येत होती.

Fire broke out in Canara Bank around dawn in bhandara, fire trucks arrived | कॅनरा बँकेत पहाटेच्या सुमारास आग, अग्निशमनची गाडी दाखल

कॅनरा बँकेत पहाटेच्या सुमारास आग, अग्निशमनची गाडी दाखल

Next

भंडारा : शहरातील बस स्टँडजवळील कॅनरा बँकेच्या शाखेत पहाटे ५.३० वाजता आग लागली. बसस्थानक परिसरात दुमजली इमारतीत ही बँक कार्यरत आहे. आगीचे वृत्त समजताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाली असून  बँकेचे अधिकारीही पोहोचले आहेत. बँकेतील स्ट्राँग रुम पूर्णपणे जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी बँकेच्या खिडकीच्या काचा फोडून आत पाणी मारण्याचा प्रयत्न केला. धुरामुळे आत प्रवेश करण्यास मोठी अडचण येत होती. मात्र, आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानी कुठलिही जीवितहानी नाही. मात्र, यापूर्वी भंडारा येथील सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर, काही दिवसांतच आगीची ही दुर्घटना घडली.  

Web Title: Fire broke out in Canara Bank around dawn in bhandara, fire trucks arrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app