शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बँकेच्या खातेदारांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

सहारा इंडिया बँकमध्ये अनेक ग्राहकांचे खाते असून त्यामध्ये अनेक खातेदारांनी गुंतवणूक केली होती. परंतु ग्राहकांची मॅच्युरिटी पूर्ण होऊनही त्यांना अजूनपर्यंत रोख रक्कम परत बँकेने दिली नाही. बँक पुन्हा रि- इन्व्हेस्टमेंट करा असे सांगून वेळ काळू पणा करत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर बँकेकडून ग्राहकांची होत असलेली फसवणूक थांबवावी, यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १९ आॅगस्ट २०१९ मध्ये सहारा इंडिया बँकेचे प्रबंधक निरज डाबरा यांच्यासोबत चर्चा देखील केली होती. त्यावर बँक प्रबंधकांनी सर्व ग्राहकांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देशिवसेनेच्या आंदोलनाला यश : चार महिन्यांत मिळणार रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : बँकेचे अतीआवश्यक गरजू खातेदारांना पुढील चार महिन्याच्या आत रोख रक्कम परत देण्यात येणार असल्याचे लिखित स्वरूपात हमीपत्र दिल्याने खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.
येथील सहारा इंडिया बँकमध्ये अनेक ग्राहकांचे खाते असून त्यामध्ये अनेक खातेदारांनी गुंतवणूक केली होती. परंतु ग्राहकांची मॅच्युरिटी पूर्ण होऊनही त्यांना अजूनपर्यंत रोख रक्कम परत बँकेने दिली नाही. बँक पुन्हा रि- इन्व्हेस्टमेंट करा असे सांगून वेळ काळू पणा करत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर बँकेकडून ग्राहकांची होत असलेली फसवणूक थांबवावी, यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने १९ आॅगस्ट २०१९ मध्ये सहारा इंडिया बँकेचे प्रबंधक निरज डाबरा यांच्यासोबत चर्चा देखील केली होती. त्यावर बँक प्रबंधकांनी सर्व ग्राहकांचे पैसे टप्प्याटप्प्याने परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन हवेत विरले असल्याचे दिसून आल्यामुळे शिवसेनेच्या वतीने ८ जानेवारी २०२० रोजी ग्राहकांसोबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु पोलिस निरीक्षक मनोज सिडाम यांचा मध्यस्थीमुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहारा इंडिया बँकेच्या दालनात बसून खातेदारांचे पैसे परत करावे, यासाठी सहारा इंडिया बँकेच्या वरिष्ठांशी शिष्टमंडळाने चर्चा केली.
सहारा इंडिया बँकेचे रिजनल मॅनजर प्रशांत आंबडकर, सेक्टर मॅनजर प्रशांत पांडे, झोनल कॉडीनेशन वर्कर नितीन मेहता यांनी चार महिन्याच्या आत रोख रक्कम परत देण्यात येणार असल्याचे लिखित स्वरूपात हमीपत्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर कारेमोरे, शहर प्रमुख नितीन सेलोकर, बेरोजगार कृती समितीचे संयोजक तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख मोहनिष साठवणे, युवासेना तालुका प्रमुख संजू डहाके, युवासेना शहर प्रमुख प्रविण गुप्ता, नितेश वाडीभस्मे, निखिलेश गजभिये, शाखा प्रमुख राहूल बानासुरे, वामनराव पडोळे सह सहारा इंडिया बँकेचे खातेदार दिनेश पसिने, सविता गभणे, संदेश तिवारी, शारदा बोन्द्रे, आनंद जैस्वाल, वैभव साठवणे, यशोदा वलथरे सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक