शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिबट अडकला पिंजऱ्यात

By admin | Updated: November 6, 2014 22:49 IST

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या जांभळी (खांबा) परिसरात मागील १५ दिवसांपासून आतंक माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सहा दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती.

वनविभागाचा जीव भांड्यात : सहा दिवसांपूर्वी महिलेला केले होते ठारसाकोली : नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या जांभळी (खांबा) परिसरात मागील १५ दिवसांपासून आतंक माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी सहा दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, आज गुरुवारला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हा बिबट्या जांभळी परिसरात लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यात अडकला आणि वनविभागाचा जीव भांड्यात पडला. साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) हे गाव जंगलाला लागून आहे. येथील ग्रामस्थांच्या २० च्यावर शेळ्यांना या बिबट्याने मारले होते. ३१ आॅक्टोबरच्या रात्री घराच्या पडवीत झोपून असलेल्या मळाबाई बावणे या वृद्ध महिलेच्या नरडीचा घोट घेऊन या बिबट्याने तिला फरफटत ऊसाच्या वाडीत नेले होते. सकाळी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर जांभळी येथे वनविभागाविरुद्ध संताप पसरला होता. बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. त्यामुळे जांभळीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. वनअधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्थिती आटोक्यात आली. त्यानंतर या बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाने वनकर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात केले. त्यानंतर जांभळी गावाच्या सभोवताल सहा पिंजरे आणि कॅमेरे लावण्यात आले होते. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या एका पिंजऱ्यासमोरुन जाताना काल बुधवारला, रात्रीच्या सुमारास हा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला होता.बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्याचे दिले होते आदेश साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) येथील महिलेला ठार केल्यानंतर ‘त्या’ बिबट्याला ठार मारण्याची मागणी खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशीवार यांच्यासह ग्रामस्थांनी या नरभक्षक बिबट्याला ठार करा, अशी मागणी केली होती. दरम्यान, प्रधानमुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ठार मारु नका, तर बिबट्याला बंदुकीच्या सहाय्याने बेशुद्ध करून जेरबंद करा, असे आदेश जारी केले होते. त्यामुळे या बिबट्यावर निगरानी ठेवण्यासाठी ठिकठिकाणी मचान बांधण्यासाठी साहित्य आणून ठेवण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)