शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM

मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथे १३ गावांसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धानाचे पोते नेले. परंतु गत अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. दररोज शेतकरी आधारभूत केंद्रावर जाऊन आपल्या धानाची मोजणी कधी होईल याची विचारणा करतात.

ठळक मुद्देताडगाव आधारभूत केंद्र : शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : घाम गाळून पिकविलेला धान शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विक्रीस नेला. मात्र गत अडीच महिन्यांपासून या धानाची खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांचा धान उघड्यावर पडून असून अवकाळी पावसाने गारपीटीने धानाचे नुकसान होण्याची भीती आहे. मोहाडी तालुक्यातील ताडगाव खरेदी केंद्रावरील या प्रकाराने शेतकरी संतप्त झाले असून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथे १३ गावांसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकºयांनी खरेदी केंद्रावर धानाचे पोते नेले. परंतु गत अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. दररोज शेतकरी आधारभूत केंद्रावर जाऊन आपल्या धानाची मोजणी कधी होईल याची विचारणा करतात. परंतु कुणीही योग्य उत्तर देत नाही. पावसापासून सुरक्षेसाठी अनेक शेतकऱ्यांनी धानपोत्यावर ताडपत्री झाकली होती. परंतु ती सुद्धा चोरीस गेल्याचे अनेक शेतकरी सांगतात. आता ताडगाव व्यतिरिक्त लोहारा, सोरणा ही गावे बाजारसमितीने जांब व चिचोली केंद्राला जोडल्याचे सांगत आहे. दुसरीकडे ताडगाव केंद्रावरील मोजणी बंद आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी संकटात सापडले आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणीही दखल घेतली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ताडगाव केंद्रावर धानाची खरेदी त्वरीत सुरु करावी अशी मागणी आहे. मोजणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.गत दोन महिन्यांपासून माझ्यासह अनेक शेतकऱ्यांचा धान केंद्राबाहेर उघड्यावर पडून आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना झाल्या नाही. धान मोजला नाही तर चुकारे कसे मिळणार. यावर तात्काळ उपाययोजना करावी.-राजेश दोनाडकर, शेतकरी.अवकाळी पावसाची भीतीताडगावसह मोहाडी तालुक्यातील अनेक केंद्रावर आजही धान उघड्यावर आहे. सोमवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. उघड्यावरील धान ओला होण्याची शक्यता आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही.

टॅग्स :market yardमार्केट यार्ड