शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
3
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
4
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
5
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
6
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
7
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
8
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
9
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
10
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
11
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
12
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
13
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
14
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
15
मराठा समाजासाठी आमच्या एवढे काम कोणी केले नाही काेणतीही याेजना बंद नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
16
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
17
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
18
भारत-नेदरलँड्स यांच्यात १७ करारांवर स्वाक्षऱ्या; पंतप्रधान मोदी-रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात.

ठळक मुद्देमासळ येथील प्रकार । धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची उडाली झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ : येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी एकाचवेळी सुमारे दहा गावातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली असून, शेतकरी धानाच्या विक्रीसाठी पोहचले आहेत.
दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात. एकादिवशी ३०० ते ३५० पोती मोजमापाची क्षमता असलेल्या केंद्रावर सुमारे आठ हजार पोती धान एकाच वेळी आल्याने ट्रॅक्टर व शेतकऱ्यांची गर्दी झाली. त्यामुळे किटाळी ते विरली या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली. पर्याय म्हणून समोरच असलेल्या मैदानावरुन जडवाहतूक, बसेस व दुचाकीस्वारांनी आपआपली वाहने वळवली. या मार्गावरुन लाखांदूर, वडसा, गडचिरोली अशा लांब पल्याच्या बसेस धावतात. सुमारे २०० ट्रॅक्टर धानाची पोती भरुन रस्त्यावर उभी असून या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. शनिवारी केवळ पाच वाजेपर्यंतच खरेदी सुरु राहील असे संस्थेच्यावतीने नोटीस लावण्यात आला आहे.
योग्य नियोजनाअभावी गरजू व गरीब शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकता येत नसल्याने अनेक शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते शेतकरी वेळेपूर्वीच आपले धान केंद्रावर घेवून येतात. मात्र गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होताना सध्यातरी दिसत आहे.
उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने हलके व भारी धान जवळपास एकाचवेळी कापणीला आले. शेतकºयांनी मळणी करुन धान शेतातच ठेवले होते. परंतु ते सुरक्षित नव्हते. शिवाय जीवनाचा रहाटगाडगा चालविण्याकरिता आर्थिक अडचणीत शेतकरी होता. धानाच्या विक्रीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहत नाही. सध्या मासळ केंद्रावर दहा हजार पोती धानाची विक्रीसाठी आवक असल्याचे दिसून येते. मासळ केंद्रावर योग्य त्या सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शेतकऱ्यांवरील संकट संपता संपेना
यावर्षी सुरूवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातीला पऱ्हे भरेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र ऐन रोवणीच्यावेळी पाऊस बेपत्ता झाला. जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. तरीही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. धान जगविले. त्यानंतरमात्र समाधानकारक पाऊस पडला. परंतु ऐन कापणीच्यावेळेस पुन्हा पावसाने कहर केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आपल्या धानाचा चुरना केला. धान वाळून विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर नेले आहे. परंतु त्याठिकाणीही मोठी गर्दी होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड