शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

युरिया खतासाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: September 25, 2014 23:18 IST

कोंढा परिसरात सध्या युरिया खताचा तुटवडा भासत आहे. कोंढा गावाचा जवळपासच्या २० गावासी संपर्क येतो. मोठी बाजारपेठ असून ६ कृषी केंद्रे आहेत. कृषी केंद्रात युरिया खत आले असल्याची माहिती

जादा भावात विक्री : शेतकरी संकटातकोंढा/कोसरा : कोंढा परिसरात सध्या युरिया खताचा तुटवडा भासत आहे. कोंढा गावाचा जवळपासच्या २० गावासी संपर्क येतो. मोठी बाजारपेठ असून ६ कृषी केंद्रे आहेत. कृषी केंद्रात युरिया खत आले असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकरी खतासाठी रांगाच्या रांगा दिसत आहेत.कोंढा परिसरात सध्या पाऊस बऱ्यापैकी पडला. त्यामुळे धान पिकाला युरिया खत टाकून धान पिक वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. अशावेळी युरिया खत दुकानात आल्याची माहिती मिळताच शेतकरी काही मिनिटांत कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. दि.२३ ला कोंढा दोन्ही कृषी केंद्रात प्रत्येकी १८० बॅग युरीया आल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी दुकानात प्रचंड गर्दी केली. अर्धा एक तासात १८० बॅग विकले. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या केंद्रात जाऊन तिथे आलेल्या युरियाच्या बॅग खरेदी केल्या. अशाप्रकारे एक दोन तासाच ३६० बॅग युरिया शेतकऱ्यांनी खरेदी केल्या. कोंढा येथे ५४० बॅग युरिया तीन कृृषी केंद्रात येणार आहे. याची कृषी विभाग पंचायत समिती पवनी व जिल्हा परिषद कृषी विभागाला माहिती असल्याने खताची गाडी कृषी केंद्रासमोर लागल्याबरोबर कृषी विभागाचे अधिकारी कृषी केंद्रात स्वत: उपस्थित झाले. त्यांनी स्वत:समोर गाडी खाली करण्यास लावून शेतकऱ्यांना केंद्र संचालकांना २९८ रूपये प्रमाणे युरिया विकण्यास सांगितले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी वानखेडे, जि.प.चे कृषी विकास अधिकारी किरवे, कृषी नियंत्रक कावळे व कृषी सहायक यावेळी कोंढा येथे युरिया विकताना स्वत: उपस्थित होते. दि.२४ सप्टेंबर रोजी कृषी केंद्र येथे १८० बॅग युरिया आला असल्याने ते विक्री करताना कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दि.२३, २४ सप्टेंबर रोजी कोंढा परिसरात युरियाची ५४० बॅग विकण्यात आले. युरियाची मागणी प्रचंड आहे. अशावेळी पुन्हा जास्तीचा युरिया खताची मागणी करणे आवश्यक आहे. खताचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कृषी केंद्रावर नजर ठेवून आहेत. यासंबंधात पंचायत समितीचे पवनी कृषी विस्तार अधिकारी वानखेडे यांना विचारले असता युरिया खत पुन्हा कोंढा येथे मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जाईल. युरिया खत जास्त भावाने विकल्यास शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावे, असे कळविण्यात आले.