शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मगरला पकडण्यात चौथ्या दिवशीही वनविभागाला अपयश

By admin | Updated: November 19, 2014 22:34 IST

तालुक्यातील चप्राड येथील तलावात मगर आढळून आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडण्यासाठी चार दिवसापासून शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु हे प्रयत्न अपुरे पडत असून

लाखांदूर : तालुक्यातील चप्राड येथील तलावात मगर आढळून आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला पकडण्यासाठी चार दिवसापासून शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु हे प्रयत्न अपुरे पडत असून या मगरीला काढण्यासाठी दररोज बघ्यांची संख्या वाढत आहे. परंतु ही मगर आढळून आल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. सुमारे १०० हेक्टर क्षेत्रात पसरलेला चप्राड तलाव पाण्याने तुडूंब भरलेला आहे. या तलावात महिला कपडे धुणे, जनावरांना पाण्यात सोडणे, इतकेच नव्हे तर शाळकरी मुले आंघोळीचा आनंद लुटतात. परंतु पाच दिवसापूर्वी या तलावात भलीमोठी मगर आढळून आल्याने नागरिकांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या मगरीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरू केले. मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली त्यामुळे वनविभागने पोलिसांना बोलाविले. घटनास्थळी कुठलिही जीवितहाणी होऊ नये, यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी तडस व पोलीस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. चार दिवसापासून मगरीला पकडण्यासाठी कोळी समाजाच्या लोकांना हाताशी धरून शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र चौथ्याही दिवशीही मगरीला पकडण्यात अपयश आले आहे. दररोज हजारो नागरिकांची गर्दी होत असल्याने या ठिकाणाला जत्रेचे रूप आले. कोळी समाजाच्या लोकांनी तलावात जाळे पसरविले मगर जाळ्यात अडकला मात्र तलावात पाणी भरपूर असल्यामुळे पकडता आले नाही.तलावाला लागूनच वसाहत असल्याने पोलीस व वनकर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मगराच्या सभोवताल जाळे पसरविण्यात आले आहे. या तलावात मच्छीमार सोसायटीने लाखोचे मासे सोडलेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये भिती निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)