शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासासाठी अतिरिक्त ६३ कोटीला मान्यता

By admin | Updated: February 9, 2016 00:39 IST

भंडारा जिल्हा विकासासाठी अतिरिक्त ६३ कोटी रूपये निधीच्या मागणीला मान्यता देण्यात येईल,...

वित्तमंत्री : जिल्हा नियोजन प्रारूप आराखडा बैठकभंडारा : भंडारा जिल्हा विकासासाठी अतिरिक्त ६३ कोटी रूपये निधीच्या मागणीला मान्यता देण्यात येईल, असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ च्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार बाळा काशीवार, जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, अपर मुख्य सचिव (नियोजन) सुनील पोरवाल, प्रधान सचिव (व्यय) सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.जिल्हा नियोजन प्रारुप वार्षिक आराखडा २०१६-१७ च्या आयोजित बैठकीत १,१५१ तलाव, मालगुजारी तलाव यांच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात सिंचन वाढीला प्राधान्य देण्यात येईल. सिंचन वाढीसोबतच मत्स्य शेती, संवर्धन आणि विकास करण्यासाठी कृषीपुरक व्यवसायामध्ये वाढ करण्यात येईल. त्यामधून रोजगार निर्मिती करणे आणि जिल्ह्याचा मानव विकास निदेर्शांक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश ना.मुनगंटीवार यांनी दिले.पूर्व विदभार्तील सिंचनवृध्दीच्या दृष्टिने भंडारा हा महत्त्वाचा जिल्हा असून, येथे मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामांच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मितीवर त्यांनी भर देताना सांगितले की, येथे मॉल्स उभारुन स्थानिक कृषी उत्पादन येथेच विक्री करायला हवे. कृषी उत्पादनावर आधारित लघु व मध्यम उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन प्रारुप आराखड्यानुसार अतिरिक्त मागणीमध्ये वन व वनपर्यटन, लहान व मोठ्या ग्रामपंचायत सुविधांसाठी अनुदान प्रदान करणे, जिल्ह्यातील युवकांना राष्ट्रीय स्तरावर सहभागी होता यावे, यासाठी आधुनिक क्रीडा संकुल, साहित्य उपलब्ध करुन देणे, व्यायामशाळा बांधणी, आरोग्य सेवा, जिल्हा रूग्णालयासाठी यंत्रसामुग्री खरेदी करणे, नगर परिषदा व नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायत विकासासाठी ही मागणी करण्यात आली. रस्ते विकास आणि बांधकाम तसेच लघुसिंचन वाढीसाठी, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी अडवणे, बंधारे बांधणे व दुरुस्ती, प्रशासकीय इमारती बांधकाम, विद्युत विकास आणि यात्रा तसेच तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी मागणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)