शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

उत्खननामुळे लाखोंचा महसूल पाण्यात

By admin | Updated: May 30, 2016 00:57 IST

हिरव्यागार रानांच्या कुशीत वसलेल्या डोंगरगाव टेकडीवर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खननामुळे लाखोंचा महसूल बुडत आहे.

माफियांची दबंगशाही : डोंगरगाव टेकडी नामशेष होण्याच्या मार्गावरउसर्रा : हिरव्यागार रानांच्या कुशीत वसलेल्या डोंगरगाव टेकडीवर गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खननामुळे लाखोंचा महसूल बुडत आहे.मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे फार पुरातन टेकडी अस्तित्वात आहे. काही टेकडी आधी हिरवीगार व सौंदर्यानी नटलेली दिसायची. पण कालांतराने काही दगडमाफियांची वाईट नजर या टेकडीवर गेली व या माफियांनी या टेकडीचे मुंडन करायला सुरुवात केली. सुरवातीला या दगडमाफियांनी शासकीय कर्मचाऱ्यांना पैशाची लालच देऊन डोंगरगाव टेकडीवर दगड उत्खनन करण्याचा धंदा सुरु केला. त्यानंतरच्या काळात गावातील सभ्य नागरिकांनी टेकडीवरील हिरवीगार झाडांची नासाडी होत असल्याची तक्रार केली. पण वनअधिकारी व संबंधित विभागाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. यानंतर या दगडमाफियांनी चक्क दबंगशाहीचा उपयोग करीत तक्रारकर्त्यांना व निसर्गप्रेमींना धमकवण्याचा सपाटा सुरु केला आहे. अशा दगडमाफियाला आता निसर्गप्रेमी दहशतीच्या वातावरणात आहेत. आजपर्यंत सदर दगडमाफियांच्या विरोधात कुणीही तक्रार केली जात नाही अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे आणि जर तक्रार झालीच तरीही त्याची सेटींग केली जाते. निसर्गनिर्मित डोंगरगाव टेकडी यामुळे सदर दगडमाफियांनी टेकडीचे पूर्णत: मुंडन करून टेकडी नामशेष होण्याच्या मार्गावर असून संबंधित विभाग याकडे पाठ फिरवत आहे. डोंगरगाव टेकडी वनविभागाची की महसूल विभागाची आहे याचे कारण मात्र अद्यापही कळू न शकल्याने हे कोडेच आहे. आजपर्यंत ज्यांनी तक्रार केली त्यांनी संबंधित विभागाला कळविले. मात्र नेमकी जागा कुणाची हे कोणी सांगायला तयार नाही. आतापर्यंत या उत्खननामुळे शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडाला हे मात्र निश्चित. पण यावर नियंत्रण असलेल्या खनिज तसेच उत्खनन विभाग निद्रावस्थेत आहे की काय असा प्रश्न निसर्गप्रेमींनी केला आहे. टेकडीवर होत असलेले झाडाची कत्तल हे वनविभागाला दिसत नाही का? गस्तीवर असताना सुद्धा दगडमाफियाला हे विभाग का म्हणून सोडत आहेत. असे अनेक प्रश्न आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून या दगडमाफियांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.(वार्ताहर)