शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा काळातही एसटी बस नाहीच, पालकांनाच सोडावे लागेल केंद्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

भंडारा विभागातील एसटी कर्मचारी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपावर आहे. संप कधी मिटणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने काही कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर बसेस सुरू केल्या. परंतु त्या सर्व शहरी भागात आहे. आता ४ मार्चपासून बारावीची आणि १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. अनेक विद्यार्थी एसटी बसने परीक्षा केंद्रावर जातात. परंतु यावर्षी ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने दिलासा मिळत असला तरी एसटीच्या संपाने दहावी, बारावीत असलेले विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेस नसल्याने पालकांनाच आपल्या मुलांना केंद्रावर सोडून द्यावे लागणार आहे.भंडारा विभागातील एसटी कर्मचारी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपावर आहे. संप कधी मिटणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने काही कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर बसेस सुरू केल्या. परंतु त्या सर्व शहरी भागात आहे. आता ४ मार्चपासून बारावीची आणि १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. अनेक विद्यार्थी एसटी बसने परीक्षा केंद्रावर जातात. परंतु यावर्षी ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना सोबतच घेवून दुचाकी अथवा खासगी वाहनाने जावे लागेल.

बारावीची परीक्षा ४ मार्च - जिल्ह्यात बारावीचे १६३ केंद्र असून येथे १७२ शाळातील १८ हजार १०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने जैय्यत तयारी केली आहे.- कोरोना संसर्गाचे सावट असल्याने परीक्षा केंद्र संबंधित शाळांमध्येच देण्यात आले आहे. याठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी परीक्षेसाठी उत्सुक असून ऑफलाईन परीक्षा होणार आहे.

दहावीची परीक्षा १५ मार्च- जिल्ह्यात दहावीचे २६९ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले. त्यात मुख्य केंद्र ८२ तर उपकेंद्र १८१ आहे. येथे २८८ शाळातील १७ हजार २० विद्यार्थी परीक्षा देतील.- दहावीची परीक्षा महत्वाची मानली जाते. मात्र कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यात आता एसटी बसचा संप असल्याने केंद्रापर्यंत पोहचण्याचे दिव्य विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पार पाडावे लागेल.

एसटीची संख्या किती वाढणार?जिल्ह्यात सध्या प्रमुख मार्गावर बससेवा सुरू आहे. संपकाळात १५२ कंत्राटी चालकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १०० चालकांची मंजुरी मध्यवर्ती कार्यालयाकडून मिळाली आहे. प्रमुख बसस्थानकांवर व गर्दीच्या ठिकाणी बुकींगसाठी कर्मचारी नियुक्तीबाबत ट्रॅयमॅक्स कंपनीला कळविण्यात आले आहे. मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच बसेसची संख्या वाढेल.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप