वाहतूक शाखेत ‘इंटरसेफ्टर’ वाहन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:00 AM2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:50+5:30

राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सुसाट वाहनांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. विविध उपाय योजूनही अपघातावर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. आता अपघातावर नियंत्रण आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असे इंटरसेफ्टर वाहन पुरविण्यात आले आहे. भंडारा जिल्हा वाहतूक शाखेत दोन वाहन दोन दिवसापुर्वी दाखल झाले आहेत.

Entering the 'Interceptor' vehicle at the Transport Branch | वाहतूक शाखेत ‘इंटरसेफ्टर’ वाहन दाखल

वाहतूक शाखेत ‘इंटरसेफ्टर’ वाहन दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देअपघात रोखण्यासाठी उपाय : लेझर स्पीड गन, टिंट मीटर, ब्रिथ अ‍ॅनालायझरची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रस्ते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेत दोन अत्याधुनिक इंटरसेफ्टर वाहन दाखल झाले असून या वाहनातील लेझरस्पिड गन, टिंट मीटर आणि ब्रिथ अ‍ॅनॉलायझरच्या माध्यमातून वाहनांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे सोयीचे होणार आहे.
राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सुसाट वाहनांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. विविध उपाय योजूनही अपघातावर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. आता अपघातावर नियंत्रण आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असे इंटरसेफ्टर वाहन पुरविण्यात आले आहे. भंडारा जिल्हा वाहतूक शाखेत दोन वाहन दोन दिवसापुर्वी दाखल झाले आहेत. एक वाहन जिल्हा वाहतूक शाखेला आणि एक गडेगाव येथील महामार्ग पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे.
या वाहनात लेझरस्पिड गन असून त्याद्वारे वाहनांचा वेग मोजता येणार आहे. सदर लेझरस्पिड गनचा वापर करून आणि त्यातील कॅमेºयाच्याद्वारे वेग ठरविणे शक्य होणार आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाºया वाहनांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी वाहन मालकाच्या मोबाईलवर तात्काळ संदेश जाईल. सदर यंत्रणा इंटरनेटद्वारे कार्यान्वीत राहणार आहे. यासोबतच या वाहनात टिंट मीटर उपलब्ध आहे. काचांवरील काळ्या रंगाच्या फिल्मची तपासणी याद्वारे केली जाईल. काळ्या रंगाची फिल्म ८० टिंटपेक्षा अधिक असता कामा नये, काळी फिल्म सदोष असल्याचे या उपक्ररणाद्वारे आढळून आल्यास मोटरवाहन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात येणार आहे.
तसेच यात ब्रेथ अ‍ॅनालायझर उपकरण राहणार असून मद्यप्राशन करणाºया वाहन चालकाची तात्काळ तपासणी केली जाईल. सदर उपकरणाद्वारे वेळीच प्रिंट काढून माहिती प्राप्त होईल. सदर चार वाहने जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून जिल्हाभर तपासणी मोहीम राबविणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविली जाणार असून मोटरवाहन कायद्याच्या उल्लंघन करणाºया वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सी.एस. चकाटे यांनी सांगितले.

वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, अपघात टाळण्यासाठी वेग नियंत्रीत ठेवावा, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
-अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.

Web Title: Entering the 'Interceptor' vehicle at the Transport Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.