शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव पथकाने टाकली नांगी

By admin | Updated: February 22, 2015 00:35 IST

चांदपूर जलाशय वितरीकेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमण हटाव मोहिमेवर गेलेल्या पथकाला नागरीकांच्या विरोधामुळै नांगी टाकली.

तुमसर : चांदपूर जलाशय वितरीकेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमण हटाव मोहिमेवर गेलेल्या पथकाला नागरीकांच्या विरोधामुळै नांगी टाकली. अतिक्रमण हटाव पथकावर रिकाम्या हाताने माघारी परतण्याची नामूष्की आली.चांदपूर गावात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. ते अतिक्रमण प्रथम काढा त्यानंतरच सिहोरा येथील चांदपूर जलाशय वितरीकेवरील अतिक्रमण काढू देऊ असा पवित्रा सिहोरा येथील नागरिकांनी घेतला. या प्रकारामुळे अतिक्रमण काढण्यास आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माघारी परतावे लागले. हा सर्व प्रकार राजकीय दबावामुळे घडला अशी परिसरात चर्चा आहे.लघु पाटबंधारे विभागांतर्गत वितरीकेवर पक्के तथा कच्चे अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी संबंधित विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने विभागाने अतिक्रमणधारांना नोटीस पाठविण्यात आले होते, परंतु अतिक्रमणधारकांवर कोणताच फरक पडलानाही. संबंधित विभागाने पाऊल उचलण्याकरीता कंबर कसली. अतिक्रमण स्थळी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी तथा पोलिस कर्मचाऱ्यांचा समवेत दाखल झाले. जून्या ग्रामपंचायत भवनाजवळ अधिकारी व अतिक्रमणधारकांत चर्चा झाली. यात चादंपूर जलाशयाच्या वितरीकेवर अनेक गावात अतिक्रमण करण्यात आले आहे. तेव्हा सिहोरा येथेच बुलडोजर चालविण्याचा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित करुन प्रथम चांदपूर येथील अतिक्रमण काढा नंतर सिहोरा येथील अतिक्रमण काढण्यास या असा खडा सवाल अतिक्रमणधारकांनी केला.अतिक्रमण काढण्याकरीता एक महिन्याचा आम्हाला वेळ द्यावा अशी मागणी अतिक्रमणधारकांनी संबंधित अधिकाऱ्यापुढे केली. एका महिन्यानंतर स्वत:च अतिक्रमण काढण्याची ग्वाही अतिक्रमणधारकांनी दिली. संबंधित विभागाने पुन्हा एका महिन्याची वेळ दिली. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचा उपविभागीय अभियंता बॅनर्जी, नायब तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, ठाणेदार रमेश इंगोले, शाखा अभियंता पुप्पलवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)