शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांचे अपडाऊन

By admin | Updated: November 23, 2014 23:12 IST

जांभळी येथील महिलेला ठार केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून त्याला गडेगाव आगार येथे ठेवण्यात आले आहे. मात्र या बिबट्याच्या सुरक्षेसाठी दररोज दोन वनरक्षक व तीन

साकोली: जांभळी येथील महिलेला ठार केल्यानंतर या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून त्याला गडेगाव आगार येथे ठेवण्यात आले आहे. मात्र या बिबट्याच्या सुरक्षेसाठी दररोज दोन वनरक्षक व तीन वनकामगार ये जा करीत आहेत. हा वनविभागावर अतिरिक्त खर्च असून वनविभागाने जर या बिबट्याला साकोली किंवा जांभळी, नर्सरी येथे ठेवले असते तर वनविभागाचा हा खर्च वाचविता आला असता. दि. ५ रोजी या बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर रात्रीच त्याला पिटेझरी येथे नेण्यात आले. त्यानंतर याला ठेवायचे कुठे यावर वनअधिकाऱ्यांची चर्चा झाली. यावेळी याला गडेगाव, आगार, साकोली नर्सरी किंवा जांभळी नर्सरी येथे ठेवण्यावर विचार सुरु होता. मात्र साकोली व जांभळी येथील नर्सरीत जर ठेवले तर बघण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढेल. त्यामुळे त्याला गडेगाव येथे ठेवण्यात आले. मात्र गडेगाव येथे फक्त दोन वनरक्षक एवढेच कर्मचारी असल्याने त्याला सुरक्षेसाठी साकोलीवरून सकाळपाळीसाठी एक वनरक्षक व एक वनमजूर तर रात्रपाळीसाठी एक वनरक्षक व दोन वनकर्मचारी ये जा करीत आहेत. दररोज साकोलीचे वनक्षेत्राधिकारी व सहाय्यक वनसंरक्षक हे पाहणी करून येतात. (तालुका प्रतिनिधी)