शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या दुष्काळाने होरपळले शेतकरी

By admin | Updated: November 16, 2014 22:45 IST

मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला.

शेतकऱ्यांवर संकट : लोकप्रतिनिधींची चुप्पी संतापजनकयुवराज गोमासे - करडी (पालोरा)मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरड्या दुष्काळाने बेजार आहे. धानाचे ऐवजी शेतकऱ्यांवर कोमेजलेला धानाचा दांडा कापण्याची वेळ आली आहे. सिंचनाची सुविधा नसलेल्या धानाचा पट्टा मातीमोल ठरला. रिसाळा मायरनरचे पाणी न मिळाल्याने करडी शेतशिवारात तर स्थिती भयावह आहे. हजारो एकर शेतात दुष्काळाच्या भेगाच दृष्टीस पडत आहेत. करडी परिसरातील शेती जुगार ठरली आहे. बिनभरवशाच्या पावसावर येथील शेती कसली जात आहे. कधी ओल्या तर बऱ्याचवेळा कोरड्या दुष्काळाचा भार येथील शेतकरी भोगत असतो. नशिबाचा भोग मानणाऱ्यांचे दु:ख समजू शकतो. मात्र मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना हे दु:ख पचवायला त्रास होत आहे. संपूर्ण करडी परिसर वैनगंगा नदीच्या पूर्वेकडे कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेला आहे. मात्र निसर्गाची अवकृपाच सदैव येथे पाहावयास मिळते. खोरा सुपिक जमिनीचा पोत असलेला असला तरी येथील विहिरींमध्ये पाण्याची मात्रा कमजोर आहे. लहान मोठे तलाव मोठ्या प्रमाणात असले तरी पाणी साठविण्याची क्षमता अगदी नगण्य आहे. तलाव उपसा करून पुनर्जीवन व खोलीकरण करण्यासंबंधीची मागणी अनेकदा होत असली तरी शासन प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शेती व जंगलावर आधारित व्यवसाय परिसरातील लोकांच्या उपजिवीकेचे साधन आहे. कोका वन्यजीव अभयारण्य आणि न्यू नागझिरा अभयारण्याने संपूर्ण जंगल ताब्यात घेतले. जंगलात जाण्याची मनाई असल्याने लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. नुकसानीचे सर्व्हेक्षण व मदत मिळाली पाहिजेकरडी परिसरात कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे, शेतीचे कंबरडे मोडले आहे. रिसाळा मायनरचे पाणी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोहचले नाही. त्यांच्या निष्काळजीपणाची, गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. परिसरातील सिंचनासाठी तलावाचे यांत्रीकी पद्धतीने खोलीकरण करून धापेवाडा उपसा सिंचन योजना तसेच सुरेवाडा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सिंचनाचे जाळे परिसरात शासन व प्रशासनाने निर्माण करावे. कोरड्या दुष्काळाचे सर्व्हेक्षण करून तात्काळ मदत देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश इलमे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण करडी परिसरावर दुष्काळाचे डोंगर उभे झाले आहे. मेहनतीने कसलेली शेती कवडीमोल ठरली. पोळ्याच्या सणानंतर पाऊस न पडल्याने हलका धान कमजोर पडला. भारी धान तर उभा वाळला. ऐकेकाळी शेतकऱ्यांच्या ५ ते १० एकर शेतात बिजाईला सुद्धा धान जमिनीतून कोठारात आले नाही. जमिनीला भेगा पडल्या तशा शेतकऱ्यांच्या काळजाला सुद्धा चरा पडल्या. होत्याचे नव्हते झाले. धान पेरणी, रोवणी व कापणीचा खर्चाबरोचर खत व इंजीनने पाणी दिलेला खर्चही बोकांड्यावर बसला. उत्पन्न होण्याऐवजी कर्जाचा डोंगर माथ्यावर उभा झाला.