सातबाराचे सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:47 PM2018-06-26T22:47:34+5:302018-06-26T22:47:59+5:30

महसूल विभागातील अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सातबारा या दस्तऐवज पुरविणाऱ्या विभागातील सर्व्हर मंगळवारी काही वेळेसाठी डाऊन झाले होते. परिणामी विद्यार्थ्यांसह नागरिक तथा शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला.

Downstream server | सातबाराचे सर्व्हर डाऊन

सातबाराचे सर्व्हर डाऊन

Next
ठळक मुद्देअनेकांना बसला फटका : तंत्रज्ञांनी सुरु केला सॉफ्टवेअर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महसूल विभागातील अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सातबारा या दस्तऐवज पुरविणाऱ्या विभागातील सर्व्हर मंगळवारी काही वेळेसाठी डाऊन झाले होते. परिणामी विद्यार्थ्यांसह नागरिक तथा शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला.
महसूल विभागाचा पाठीचा कणा व त्यातून मिळणारे उत्पन्न शेतजमिनीचा साझा क्रमांक व त्यावर आधारित सातबारा सर्वांसाठीच उपयुक्त आहे. सातबारा देण्याच्या पद्धतीत कालांतराने बदलाव होत गेले.
विद्यमान स्थितीत महसुल विभागातून संगणकीय व आॅनलाईन पद्धतीने सातबारा दिला जात आहे. या सर्व प्रणालीत तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त उपयोग होत असतो.
त्यामुळे पर्यायाने इंटरनेट जोडणीवर आधारित असलेल्या या यंत्रणेला अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास काही तासासाठी सदर सर्व्हर डाऊन झाले होते.
सद्यस्थितीत दहावी व बारावी परीक्षेचे निकाल घोषित झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेणाºयांसह इतर शैक्षणिक कामासाठी दस्ताऐवजांची आवश्यकता भासते. यात सातबाराचाही समावेश असतो. याशिवाय जमिन खरेदी - विक्री, नोटरी याशिवाय अन्य कामांसाठी सातबाराचा वापर केला जातो. सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना याचा फटका बसला.
ही बाब तहसील कार्यालयाला माहित होताच संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करीत तंत्रज्ञ यांना पाचारण करून सर्व्हर अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही वेळेनंतर तंत्रज्ञ यांना सर्व्हर दुरुस्त करण्यात यश लाभल्याने ते पुर्ववत सुरु झाल्याने नागरिकांसह शेतकºयांनाही सातबाराचे वाटप करण्यात आले.
उल्लेखनीय म्हणजे सर्व्हर बंद असताना किती शेतकऱ्यांसह किली जणांना याचा फटका बसला याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

सातबारा विभागातील सर्व्हर दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास बंद झाले होते. संबंधित तंत्रज्ञ यांना पाचारण करून ते पूर्ववत सुरु करण्यात आले.
-संजय पवार,
तहसीलदार, भंडारा.

Web Title: Downstream server

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.