शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

८० जिल्हा परिषद शाळांना वर्गखोल्यांची 'दिवाळी भेट'

By admin | Updated: November 6, 2014 00:59 IST

जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा व अपंगाना सर्वसमावित शिक्षण मिळावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.

भंडारा : जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा व अपंगाना सर्वसमावित शिक्षण मिळावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. याअनुशंगाने जिल्ह्यातील ८० जिल्हा परिषद शाळांना नविन वर्गखोल्या बांधकामाची मंजुरी मिळाली आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाला दोन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यामातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षण प्रवाहात आणण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासोबतच अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत शिक्षण मिळावे, यासाठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. अपंगांना शाळेत प्रवेश करताना अडचण निर्माण होऊ नये, म्हणून रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.वार्षीक कार्य योजना अंदाजपत्रक सन २०१४-१५ अंतर्गत ८० जिल्हा परिषद शाळांना नविन वर्गखोल्यांची मंजुरी मिळाली आहे. या वर्गखोल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या व शिक्षक संख्येनुसार मंजुर करण्यात आल्या आहेत. इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळांना नविन धोरणानुसार पाचवा वर्ग जोडण्यात आल्याने वर्गखोल्यांची गरज भासली. त्यानुसार या वर्ग खोल्याना मंजुरी मिळाली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील २२३ शाळांना वाढीव वर्ग खोल्या मंजुरीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यातील ८० वर्गखोल्यांना नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. यासोबतच जुन्या बांधकाम झालेल्या वर्गखोल्यांपैकी १७ शाळांना रॅम्प मंजूर करण्यात आले आहे. या रॅम्पसाठी प्रत्येकी २० हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. ८० वर्गखोल्यांसाठी सर्व शिक्षा अभियान विभागाने ४.५० कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी शासनाने २ कोटींचा निधी मंजूर करून तो वळता केला आहे. हा निधी सर्व शिक्षा अभियान विभागाला प्राप्त झाला आहे. एका वर्गखोलीसाठी प्रत्येकी ५ लाख ५० हजार प्राप्त झाले आहे. या रक्कमेत रॅम्प, विद्युतीकरण व साहित्य खरेदी करावयाची आहे. साहित्य खरेदीवर ३० हजार तर विद्युतीकरणावर २० हजार रूपये खर्च करावयाचे आहे. (शहर प्रतिनिधी)