जिल्ह्यात पावसाळी आजारांचे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:56 AM2019-08-11T00:56:53+5:302019-08-11T00:57:13+5:30

वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

District rains increase in patients | जिल्ह्यात पावसाळी आजारांचे रुग्ण वाढले

जिल्ह्यात पावसाळी आजारांचे रुग्ण वाढले

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । रुग्णालये हाऊसफुल्ल, बालकांना ताप, जुलाब, उलटीचा होऊ लागला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.
ढगाळ वातावरण, रिमझिम पावसामुळे सध्या जिल्ह्यात विषाणूजन्य आजार वाढत आहेत. त्यामध्ये व्हायरल न्यूमोनिया, व्हायरल डायरिया, विषाणू मेंदूज्वर, डोकेदुखी, ताप, हातपाय गळणे, डेंग्युसदृश्य, जुलाब, उलटी आजार वाढलले आहेत. हे आजार बालकांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी होत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये आजारी बालकांची संख्या वाढली आहे.
पावसाळा लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच पावसाळ्यात जलस्त्रोतांचे पाणी वाढते आणि या पाण्याचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिक पिण्यासाठी करतात. त्यामुळे साथ रोगाचे आजार उद्भतात. हे आजार होऊ नयेत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये व्हायरल न्यूमोनिया, तापाचे प्रमाण आढळून येत असून व्हायरल डायरियाचे प्रमाण जास्त आहे. तापाचे रुग्ण असले तरी ते क्रिटीकल नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आजार टाळण्यासाठी स्वच्छता बाळगावी, प्रत्येकांनी शुद्ध पाणी प्यावे, विशेष करून उकळलेले पाणी प्यावे, घर परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे कटाक्षाने टाळण्याची गरज आहे.

डॉक्टरांकडे जाऊनच औषध घ्यावी
बालकांंमध्ये विषाणूजन्य मेंदूज्वर, व्हायरल ताप, डेंग्यूसदृश्य आजार, जुलाब उलटी, डोकेदुखी असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने उघड्यावरील खाणे टाळणे गरजेचे आहे. तसेच परिसराची स्वच्छता राखावी.बालकांत तापसदृश्य आजार होऊ नये यासाठी पाणी उकळून प्यावे. ताप आल्यास थंड पाण्याने संपूर्ण शरीर पुसून घ्यावे. त्यामुळे डोक्यापर्यंत ताप जात नाही. तसेच जेवणात पातळ पदार्थ खावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये, डॉक्टरांकडे जाऊनच औषधी घ्यावी.

Web Title: District rains increase in patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य