जिल्ह्याची वाटचाल अनलाॅक ‘लेव्हल वन’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 AM2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:25+5:30

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने ७ जूनपासून अनलाॅक प्रक्रियेला सुरुवात केली. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडवरून अनलाॅक प्रक्रियेच्या काेणत्या टप्प्यात जिल्हा आहे, याची वर्गवारी करण्यात आली. भंडारा जिल्ह्याचा गत आठवड्यात पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के आणि भरलेले ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के हाेते. ज्या ठिकाणचा पाॅझिटिव्ही रेट ५ टक्क्यापेक्षा कमी आणि २५ टक्क्यापेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहे.

The district is moving towards Unlock ‘Level One’ | जिल्ह्याची वाटचाल अनलाॅक ‘लेव्हल वन’कडे

जिल्ह्याची वाटचाल अनलाॅक ‘लेव्हल वन’कडे

Next
ठळक मुद्देसाप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट १.२२ : ऑक्सिजन बेडवर असलेले रुग्ण १.६० टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली. पाच टप्प्यात जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली. निकषानुसार भंडारा जिल्हा अनलाॅक प्रक्रियेच्या लेव्हल तीनमध्ये आला. अंशत: अनलाॅक प्रक्रियेला प्रांरभ झाला. आता आठवड्याभरात रुग्णसंख्या वेगाने कमी झाल्याने साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट १.२२ टक्क्यापर्यंत खाली आला असून ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची संख्याही १.६० टक्केच आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल अनलाॅक प्रक्रियेच्या लेव्हल वनकडे असून प्रशासन याबाबतचा आदेश केव्हा निर्गमित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य शासनाने ७ जूनपासून अनलाॅक प्रक्रियेला सुरुवात केली. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट आणि भरलेल्या ऑक्सिजन बेडवरून अनलाॅक प्रक्रियेच्या काेणत्या टप्प्यात जिल्हा आहे, याची वर्गवारी करण्यात आली. भंडारा जिल्ह्याचा गत आठवड्यात पाॅझिटिव्हिटी रेट ७.६७ टक्के आणि भरलेले ऑक्सिजन बेड ४.४१ टक्के हाेते. ज्या ठिकाणचा पाॅझिटिव्ही रेट ५ टक्क्यापेक्षा कमी आणि २५ टक्क्यापेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहे. तेथे पहिल्या टप्प्याचे निकष लागू करण्यात आले. परंतु भंडारा जिल्ह्यात भरलेले ऑक्सिजन बेड कमी असले तरी पाॅझिटिव्हिटी रेट निकषापेक्षा अधिक हाेते. त्यामुळे जिल्ह्याला अनलाॅक प्रक्रियेच्या तिसऱ्या लेव्हलमध्ये समाविष्ट करण्यात आले. सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
आता आठवड्याभरात भंडारा जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या वेगाने कमी झाली आहे. आठवड्याभरात ११ हजार २२४ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ १३७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. साप्ताहिक पाॅझिटिव्हिटी रेट एकदम खाली म्हणजे १.२२ टक्क्यावर आला आहे. दुसरीकडे ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही ४.४१ टक्क्यांवरून १.६० टक्क्यांवर आली आहे. जिल्ह्यात १० ऑक्सिजन बेडवर उपचार सुरू असून ५९३ रिकामे बेड आहेत. तर व्हेंटिलेटर असलेले दाेन बेडवर उपचारासाठी रुग्ण दाखल असून १४३ बेड रिकामे आहेत. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचे भरलेले बेड १२ असून ७३६ बेड रिकामे आहेत. 
रुग्णांची संख्या वेगाने कमी झाल्याने जिल्ह्याची वाटचाल लेव्हल वनमध्ये सुरू झाली आहे. लेव्हल वनचे सर्व निकष भंडारा जिल्हा पूर्ण करीत आहे. आता केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. लेव्हल वनमध्ये आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व दुकाने व व्यापार सुरू ठेवता येणार आहे. मात्र जिल्हा प्रशासन लेव्हल वनच्या आदेशाबाबत विचार करीत असल्याचे दिसून येते. ज्या जिल्ह्यांना लेव्हल वनची सूट मिळाली. त्या जिल्ह्यांमध्ये काेराेना रुग्ण वाढत असल्याचा अनुभव आहे. 

शुक्रवारी ९० काेराेनामुक्त, २४ पाॅझिटिव्ह
- जिल्ह्यात शुक्रवारी ९० व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली तर २४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. कुणाच्याही मृत्यूची नाेंद घेण्यात आली नाही. १६२१ व्यक्तींची चाचणी करण्यात आल्यानंतर भंडारा तालुक्यात ७, माेहाडी ०३, तुमसर २, पवनी ४, लाखनी १, साकाेली ३ आणि लाखांदूर तालुक्यात ४ असे २४ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या ४०१ व्यक्ती उपचाराखाली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ५९ हजार २५६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी ५७ हजार ८०० व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली तर १०५५ जणांचा काेराेनाने बळी गेला.

 

Web Title: The district is moving towards Unlock ‘Level One’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.