जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:19+5:302021-01-17T04:30:19+5:30

बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शिंगणजुडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर देशमुख, प्रा.संजय लेनगुरे उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालय ...

District level online oratory competition | जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा

googlenewsNext

बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शिंगणजुडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर देशमुख, प्रा.संजय लेनगुरे उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालय गटातून प्रथम क्रमांक नूतन कनिष्ठ महाविद्याल भंडाराची विद्यार्थिनी तनिषा लक्ष्मण सेलोकर हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक पल्लवी शेंडे, तृतीय शुभांगी किरपाने, उत्तेजनार्थ नेहरू विद्यालयाची विद्यार्थिनी भारती बघेले.

माध्यमिक विद्यालय गटात प्रथम क्रमांक शारदा विद्यालय तुमसर येथील विद्यार्थिनी मीनाक्षी सुनील चिंधालोरे, द्वितीय क्रमांक अनुष्का मोहतुरे, तृतीय क्रमांक सुरभी बघेले, उत्तेजनार्थ हरिओम बांते यांनी पटकाविला आहे. यशस्वितेसाठी प्राचार्य थोटे, प्रा.मोहन शेंडे, नलिनी धुर्वे, रमेश बोंद्रे, कल्पना मल्लेवार, सतिष बडवाईक, रमेश बुरडे, नंदू रोकडे यांनी सहकार्य केले. संचालन दामिनी पटले हिने, तर आभार कुणाल बांडेबुचे यांनी मानले.

Web Title: District level online oratory competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.