इंधन दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसची भंडाऱ्यात पेट्रोल पंपासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:33+5:302021-06-09T04:43:33+5:30

पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर झाले असून, डिझेल ९२ रुपये लिटर आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ९०० रुपये आहे. या ...

District Congress protests in front of petrol pumps against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसची भंडाऱ्यात पेट्रोल पंपासमोर निदर्शने

इंधन दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसची भंडाऱ्यात पेट्रोल पंपासमोर निदर्शने

पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर झाले असून, डिझेल ९२ रुपये लिटर आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ९०० रुपये आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाने सर्वसामान्य जनता त्रस्त असून इंधन दरवाढीने त्यात भर घातली आहे. याचा निषेध करण्यासाठी भंडारा येथील मिस्कीन टँक परिसरातील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, धनराज साठवणे, धनंजय तिरपुडे, प्रशांत देशकर, प्यारेलाल वाघमारे, शमीम शेख, अजय गडकरी, प्रमोद मानापुरे, महेंद्र वाहाणे, गणेश लिमजे, मकसूद पटेल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सामान्यांच्या हिताचा निर्णय घ्या - मोहन पंचभाई

केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणीत युपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाट वाढल्या होत्या. मात्र, देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देणारी भूमिका त्यांनी घेतली होती. युपीए सरकारच्या काळातील किमती आणि सध्याच्या सरकारच्या काळातील किमतीशी तुलना करता जवळपास ५० टक्के एवढ्या कमी असताना मोदी सरकारने डिझेल आणि पेट्रोलचे दर भरमसाट वाढविले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरवाढ कमी करावी अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केली.

Web Title: District Congress protests in front of petrol pumps against fuel price hike