शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अन्‌ जिल्हाधिकारी दुचाकीने पोहोचले पूरबाधीत ‘आवळी’ गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

तालुक्यातील आवळी गावात नेहमीच पुराचा जबर फटका बसत असतो. या परिस्थितीत स्थानिक आवळी येथील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी भर पुरातन डोग्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो. एवढेच नव्हे तर या गावातील विद्यार्थी व नागरिक आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून पावसाळ्यात वंचित राहत असतात. यासंबंधाने परिस्थितीवर उपाय योजना ब पावसाळ्यात खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी होण्यासाठी जिल्हाधिकारी कदम यांनी आवळी गावात भेट दिली.

ठळक मुद्देमान्सून पुर्व उपाय योजनांवर केली चर्चा : समस्या घेतल्या जाणून

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : वैनगंगा व चुलबंद नदीच्या वेढ्यात वसलेल्या आवळी गावात पावसाळ्यात निर्माण होणारी  पूरपरिस्थिती व विविध समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यानी दुचाकीने आवळी गावात जाऊन विविध समस्यांवर नागरिकांशी चर्चा केली. शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आवळी गावात जिल्हाधिकारी चक्क दुचाकीने आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही बसला.तालुक्यातील आवळी गावात नेहमीच पुराचा जबर फटका बसत असतो. या परिस्थितीत स्थानिक आवळी येथील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी भर पुरातन डोग्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो. एवढेच नव्हे तर या गावातील विद्यार्थी व नागरिक आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून पावसाळ्यात वंचित राहत असतात. यासंबंधाने परिस्थितीवर उपाय योजना ब पावसाळ्यात खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी होण्यासाठी जिल्हाधिकारी कदम यांनी आवळी गावात भेट दिली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावालगतच्या वैनगंगा नदी पात्रासह गावातील प्राथमिक शाळा, पाणीपुरवठा योजना यासह अन्य शासन सुविधांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. दरम्यान, पूरपरिस्थितीत या गावातील शेतपिकांच्या हानीबद्दल देखील माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी  नागरिकांना पावसाळ्यात निर्माण पूरपरिस्थिती व पुनर्वसन संबंधाने विचारणा केली. असता शासनाकडून   विविध मागन्यांची पूर्तता न झाल्याने पुनर्वसन खोळंबल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सोनी व आवळी गावाच्या मधोमध असलेल्या चूलबंद नदीतून पायी जात दुचाकीने प्रवास करून आवळीवासीयांची भेट व चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, ठाणेदार मनोहर कोरेटी, सहायक ठाणेदार विरसेन चहान्दे, बिडिओ प्रमोद वानखेडे, विस्तार अधिकारी गडमडे, ग्रामसेवक लांजेवार, तलाठी मेश्राम, कौरवार  पोलीस पाटील, सरपंच  होमराज  ठाकरे,  शहारे  गुरुजी यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. 

पुनर्वसित गावात जाण्यास तयार नाहीत ५० वर्षांपूर्वी या गावाचे तालुक्यातील इंदोरा येथे शासनाने पुनर्वसन करताना शेत जमिनीसह भूखंडदेखील उपलब्ध केले आहे. मात्र उपलब्ध करण्यात आलेली शेतजमीन पीक घेण्यायोग्य नसल्याने या गावातील नागरिकांनी मागील अनेक वर्षांपासून जमिनीची सुधारणा करून देण्याची मागणी केली आहे. मात्र शासनाकडून सदर जमिनीच्या सुधारणा विषयक कोणत्याच उपाययोजना न करण्यात आल्याने या गावातील नागरिक पुनर्वसित गावात जाण्यास तयार नसल्याचे सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी