शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त निधीतून जिल्हा बाद

By admin | Updated: February 19, 2016 00:58 IST

खरीप हंगामांतर्गत अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून

इंद्रपाल कटकवार ल्ल भंडाराखरीप हंगामांतर्गत अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्हा बाद झाला आहे. परिणामी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या जिल्ह्यातील ३७१ गावांतील शेतकरी मदतीविना राहणार आहेत. कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुल्तानी संकटाला बळी पडावे लागणार आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार, राज्याच्या विविध भागात एकूण १५ हजार ७४७ गावांमध्ये वर्ष २०१५ मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले होते. धानाची उतारीही कमी भरली होती. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत जाहिर करण्यात आली. यात दोन हजार कोटी रूपये बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली होती. राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त गावांपैकी भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या दृष्टीकोनातून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. या गावांमधील शेतकऱ्यांना शासकीय निर्देशानुसार काही दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र दोन हजार कोटी रूपयांच्या वाटपात नागपूर विभागांतर्गत फक्त दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपुर १ कोटी ५९ लक्ष व गडचिरोली १४ कोटी ३६ लक्ष जिल्ह्यांचा समावेश असून भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्हे वगळण्यात आली आहेत.अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी४खरीप पिकांची अंतिम पैसेवारी अंतर्गत जिल्ह्याची पैसेवारी ५४ पैसे आहे. तालुकानिहाय अंतर्गत भंडारा तालुक्याची पैसेवारी ६२ पैसे, पवनी ६४ पैसे, तुमसर ६१ पैसे, मोहाडी ५२ पैसे, साकोली ४४ पैसे, लाखांदूर ४८ पैसे तर लाखनी तालुक्याची आणेवारी ४४ पैसे आहे. ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ४७५ आहे.दुष्काळग्रस्त घोषित तालुकानिहाय गावांची संख्या४जिल्ह्यातील एकूण ८४६ गावांतर्गत खरीप पिकांची आणेवारी ३१ डिसेंबर २०१५ ला घोषित करण्यात आली. यात ३७१ दुष्काळग्रस्त गावांपैकी भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १२, मोहाडी ७०, साकोली ९४, लाखांदूर ८९ तर लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे.तांदळाच्या कोठारात राजकीय उदासिनता४पूर्व विदर्भात तांदळाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील बळीराजावर सातत्याने अस्मानी व सुल्तानी संकट येत आहे. सातही तालुक्यांमध्ये अंदाजाप्रमाणे धानाचे उत्पादन झाले नाही. निसर्गाच्या अवकृपेने उतारीत प्रचंड घट झाली. आणेवारीतही जुनी पद्धत अवलंबविल्याने बळीराजाच्या मानगुटीवर टांगती तलवार होती. जिल्ह्यातील ८४६ गावांपैकी फक्त ३७१ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित झाले. आणेवारीच्या फटक्यात जिथे जास्त नुकसान झाले, तिथे सरासरीत मापदंडात शेतकरी भरडला गेला. दुसरीकडे राजकीय उदासिनतेमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित झालेल्या निधीत भंडारा जिल्ह्याला स्पष्टपणे डावलण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आतातरी जागे होणार काय, असा सवाल आहे.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या यादीसह शासनाकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अजुनपर्यंत निर्णय प्राप्त झालेला नाही. याकडे पाठपुरावा सुरु आहे. -डॉ. सुजाता गंधे, उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा.