शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन लाख एलईडी बल्बचे होणार वाटप

By admin | Updated: February 6, 2016 00:35 IST

विजेच्या बचतीसाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीकडून भंडारा जिल्ह्यात दोन लाख लोकांना एलईडी बल्बचे वितरण करणार आहे.

भंडारा : विजेच्या बचतीसाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीकडून भंडारा जिल्ह्यात दोन लाख लोकांना एलईडी बल्बचे वितरण करणार आहे. गुरूवारला मोहाडी येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. विजेची थकबाकी नसणाऱ्या ग्राहकांना विजेच्या महाबचतीसाठी एलईडी बल्बचे वितरण करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत भंडारा जिल्ह्यात एलईडी बल्बचे वितरण महावितरण कंपनीच्या पुढाकाराने करण्यात आले. यात प्रत्येक ग्राहकाला १०० रूपयांप्रमाणे कमाल १०, किमान दोन बल्ब देण्यात येईल. सात वॅटचा एलईडी बल्ब हा सामान्य बल्बइतका प्रकाश देतो़. या बल्बने विजेची ८० टक्के बचत होते़ या योजनेअंतर्गत ४०० रूपयांचा एलईडी बल्ब ग्राहकांना केवळ १०० रूपयात वितरीत करण्यात येणार आहे़ सुलभ हफ्त्याने हे बल्ब हवे असल्यास १० रूपये रोख व ९ रूपयांच्या १० समान हफ्त्यात व शेवटच्या हफ्त्यात ५ रूपये असे १०५ रूपयात खरेदी करता येऊ शकणार आहे़ या बल्बवर तीन वर्षांची मोफत बदलून देण्याची वारंटी आहे़ हे बल्ब मिळण्यासाठी चालू भरलेले वीज बिलाची झेरॉक्स व ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड द्यावे लागणार आहे़ सुलभ हफ्त्याची सुट ही केवळ चार बल्बसाठी राहणार असून एका ग्राहकाला जास्तीत जास्त १० बल्ब खरेदी करता येऊ शकणार आहे. ऊर्वरीत सहा बल्ब १०० रूपये प्रति बल्बप्रमाणे देण्यात येईल. या योजनेसंदर्भात बोलताना अधीक्षक अभियंता सुरेश मडावी म्हणाले, भंडारा जिल्ह्यात दोन लाखावर महावितरणच्या ग्राहकांची संख्या आहे. कनेक्शन वाढले तर ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या योजनेतंर्गत तालुकास्तरावर एलईडी बल्ब वितरण करण्यात येणार असून त्यानुसार बल्बचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. मोहाडीतून शुभारंभ भंडारा जिल्ह्यात गुरुवारला मोहाडीत एलईडी बल्ब वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, एलईडी बल्बच्या वापराबाबत व ऊर्जाबचतीचे महत्त्व सांगुन सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे, उपाध्यक्ष सुनिल गिऱ्हेपुंजे, पंचायत समिती सभापती हरीशचंद्र बंधाटे उपस्थित होते़ (जिल्हा प्रतिनिधी)