शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 00:44 IST

वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यासाठी सिहोरा परिसरात नव्याने तीन फिडर तयार करण्यात आले आहेत.

तीन फिडर बंदच : ४७ गावांसाठी केवळ तीन फिडर, विजेचा लपंडाव सुरूचुल्हाड (सिहोरा) : वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यासाठी सिहोरा परिसरात नव्याने तीन फिडर तयार करण्यात आले आहेत. परंतु या फिडरांना सुरू करण्याची मंजुरी मिळाली नाही. यामुळे एका गावासाठी १५ गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे संकट ओढावले आहे.सिहोरा परिसरातील वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्यासाठी स्थानिक वीज वितरण कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करित आहे. या कार्यालयात सिहोरा १ आणि २ अशी विभागणी करण्यात आली असून स्वतंत्र शाखा अभियंते कार्यरत आहेत. या विभागांना गावांना जोडण्यात आले आहे. ४७ गावांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी बपेरा, सिहोरा आणि चांदपूर अशी तीन जुनी फिडर आहेत. एका फिडरला सरासरी १५ गावांना जोडण्यात आले आहे. या फिडरमधून घरगुती वीज ग्राहक, कृषी पंपधारक शेतकरी, व्यवसायीक तथा अन्य ग्राहकांना विजेचा पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे. एका गावात वीज प्रवाहात तांत्रिक बिघाड येताच अन्य १५ गावांचा विज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. यामुळे १७ ते २० हजार नागरिकांना अंधारांचा सामना करण्याची वेळ येत आहे.या फिडरचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी स्थानिक कार्यालय मार्फत जिल्हा कार्यालयाला सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. पत्रव्यवहाराचे ढिग तयार झाले आहे. परंतु जिल्हा कार्यालयाला मंजुरीची परवानगी देणारी 'अ‍ॅलर्जी' असल्याचे दिसून येत आहे. फिडर तयार असताना वीज पुरवठा सुरू करण्यास स्थानिक कार्यालयाची यंत्रणा उत्सुक असताना जिल्हा महावितरणची यंत्रणा यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. दरम्यान परिसरात वारंवार विजेच्या लपंडावाचे चित्र असताना सत्ताधारी पुढारी शांत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)सिहोरा परिसरात तीन नव्याने फिडर तयार करण्यात आले असताना विज पुरवठा सुरू करण्याची मंजुरी देण्यास निष्क्रियता दाखविण्यात येत असल्याने खपवून घेतले जाणार नाही. यासाठी रास्ता रोको आंदोलनाची भूमिका घेतली जाईल.-राजेंद्र पटले, जिल्हाप्रमुख, शिवसेना, भंडारा.