शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत

By admin | Updated: October 12, 2015 01:15 IST

खरिप हंगामात नदी पात्रातून चांदपुर जलाशयात पाण्याचा उपसा सोंड्याटोला सिंचन प्रकल्प करीत असतांना वीज बिलाची ..

रंजित चिचखेडे  चुल्हाड (सिहोरा) खरिप हंगामात नदी पात्रातून चांदपुर जलाशयात पाण्याचा उपसा सोंड्याटोला सिंचन प्रकल्प करीत असतांना वीज बिलाची थकबाकी वाढल्याने वीज वितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली आहे. यामुळे प्रकल्प स्थळात अंधार पसरला आहे. विदर्भ वैज्ञानिक विकास मंडळाच्या निष्काळजीपणावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.अत्यल्प पावसाने हजेरी लावली आहे. नदीचे पात्र आणि नाल्यात पाणी अडविले जात आहेत. येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जाणार असल्याची वेळ येणार असल्याने ही उपाययोजना केली जात आहे. परंतु या प्रकारापासून वीज वितरण कंपनी बेफिकीर आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने चढ-उताराचा अनुभव घेतला आहे. विस्तीर्ण चांदपुर जलाशयात पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी आधीपासून बोंब सुरु केली आहे. बावनथडी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने ४ आॅगस्टला प्रकल्प स्थळात ६ पंप गृह सुरु करण्यात आले. याच कालावधीत नादुरुस्त ३ पंपगृह नागपुरच्या एका इंजिनिअरींग वर्कशॉप कंपनीला दुरुस्ती करीता देण्यात आले. यापैकी एका पंपगृहाचे काम पुर्ण झाले असून उर्वरीत २ पंप गृहाचे कामे प्रगती पथावर आहे. शेतकऱ्यांचे हितासाठी बुंद-बुंद पाण्याचा उपसा करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरु असतांना विज वितरण कंपनीने थकीत विज देयकांची आडकाठी आणली आहे. जलाशयात ८ फूट पाणी असतांना महिना भरात ३० फूट पाण्याची साठवणुक पर्यंत प्रकल्पाने मजल मारली आहे. प्रकल्पानेच शेतकऱ्यांना तारले आहे. यामुळे १२ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आली आहे. प्रकल्पावर ३४ लाखांचे वीज बिल देयक थकीत आहे.