शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे भंडारा शहरात आगमण होताच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने सत्कार करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील आणि राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देनाना पटोले : कास्ट्राईब कल्याण संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी सत्कार, मागण्यांचे निवेदन देऊन केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कास्ट्राइब कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यास कटीबध्द असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी एका शिष्टमंडळाला आश्वासन दिले.विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे भंडारा शहरात आगमण होताच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या भंडारा जिल्हा शाखेच्यावतीने सत्कार करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील आणि राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. निवेदनातून प्रामुख्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ सुरू करण्यात यावे, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, १६ आॅक्टोबर २०१६ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे समान काम समान वेतन तत्वावर समान वेतन देण्यात यावे, आरोग्य सेवेतील कार्यरत कंत्राटी आरोग्य सहाय्यीका, सेविका यांना सेवा ज्येष्ठतेनुसार विना अट रिक्त पदावर शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, माहे एप्रिल व मे २०१९ रोजीच्या सरळ सेवा भरतीत ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांची निवड परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी, भूविकास बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांचा थकीत असलेला ५० महिन्यांचा पगार, पीएफ, ग्रॅच्युएटी व इतर आर्थिक लाभ देण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देवून त्यांना न्याय देण्यात यावा, जिल्ह्यातील, राज्यातील आरोग्य सेवेतील जिल्हा परिषद व आरोग्य सेविका अधिपरिचारीका यांना सेवत कायम करण्यात यावे, तसेच सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करून निघणारी थकबाकी रोख स्वरूपात देण्यात यावी, सहा लाख ५० हजार मागासवर्गीय कर्मचाºयांचा असलेला अनुशेष शासनाने तात्काळ भरावा तसेच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे विशेष लक्ष देवून जिल्ह्याचा पर्यटनासह सर्वागिण विकास करावा अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.यावेळी महासंघाच्या भंडारा शाखेचे सुर्यभान हुमणे, मनिष वाहणे, विनय सुदामे, हरिश्चंद्र धांडेकर, डॉ. मधुकर रंगारी, डॉ. विनोद भोयर, सिद्धार्थ भोवते, अजय रामटेके, विनोद बन्सोड, यशवंत उईके, ओमप्रकाश शामकुंवर, युवराज रामटेके, विजय नंदागवळी, कार्यालयीन प्रमुख दिनेश मेश्राम यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले