शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हांडला येथे राष्ट्रीयकृत बँकेची मागणी

By admin | Updated: September 27, 2014 23:11 IST

राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती होत आहे. विरली बु. येथे एकमेव वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेची शाखा आहे. त्या बँकेमध्ये कामाचा वाढलेला व्याप आणि कर्मचाऱ्याची कमतरता यामुळे सकाळी १० वाजता

कऱ्हांडला : राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची सक्ती होत आहे. विरली बु. येथे एकमेव वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेची शाखा आहे. त्या बँकेमध्ये कामाचा वाढलेला व्याप आणि कर्मचाऱ्याची कमतरता यामुळे सकाळी १० वाजता बँकेमध्ये गेलेला ग्राहक गर्दीमध्ये सायंकाळपर्यंत ताटकळत राहतो. व्यवहार दिरंगाईमुळे ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. विरली बु. येथे राष्ट्रीयकृत बँकेची मागणी नागरिकांनी केली आहे.बँकेत खाते उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले पाचगाव, पालेपेंढरी गावापर्यंतचे ग्राहक जोडण्यात आलेले असल्यामुळे या एकमेव बँकेमध्ये गर्दीच गर्दी बघावयास मिळते. प्रत्येक कामासाठी बँकेचे खाते अनिवार्य झाला आहे. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, प्रत्येक कामाचा मोबदला बँकेच्या खात्यावरच जमा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसहाय राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये जमा होते. महिला बचत गटाचा वाढलेला व्याप विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसहाय्य गरिबांना मिळणाऱ्या घराच्या बांधकामाचा आर्थिक अर्थसहाय लाभ, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, सोने तारण इतर प्रकारचे कर्ज आणि विविध योजनेचे आर्थिक मदत आणि वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार असे एकंदरीत सर्वच व्यवहार बँकेमधून होत आहेत. आॅनलाईन प्रक्रियेमुळे बँकेचे व्यवहार सोपे झाले आहेत. मात्र लिंक फेलमुळे सुविधा त्रासदायक ठरत आहे. ग्राहकांची वाढलेली संख्या आणि आर्थिक व्याप लक्षात घेता राष्ट्रीयकृत बँकेची गरज आहे. (वार्ताहर)