शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार रुपये देण्यात येणार आहे असे सांगितले. परंतु आजपावेतो एकही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा तालुक्यातील वैनगंगा व सुर नदीच्या खोऱ्यात वसलेल्या खमाटा टाकळी गावातील शेतकऱ्यांना शासकीय लाभापासून दूर ठेवण्यात आले. अशा वंचित व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम तात्काळ मिळण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने निवासी जिल्हाधिकारी विलास ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार, नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ ला कृषी विभाग भंडारा मार्फत ग्रामपंचायत काार्यलय खमाटा येथे हरभरा ही बिजाई देण्यात आली. शेतकऱ्यांनी बिजाई लावली. त्यावेळी शेतकऱ्यांना खत आणि औषधांसाठीे १२३५ रुपये मिळणार होते. पूर्ण वर्ष संपत आला. परंतु अजूनपर्यंत ती रक्कम मिळाली नाही. ती रक्कम तातडीने देण्यात यावी, केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजना घोषीत केली. त्यात वर्षाचे सहा हजार रुपये देण्यात येणार आहे असे सांगितले. परंतु आजपावेतो एकही रक्कम खात्यावर जमा झालेली नाही. शासन प्रशासनाने शेतकरी सन्मान योजनांचे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करावी, सप्टेंबरच्या ९ व १० तारखेला वैनगंगा नदीला महापूर आला. या महापुरात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महापुरात शेतकºयांचे धानाचे पीक, लालभाजी, पालकभाजी, भेंडी ही पिके बुडाली असून वांग्याचे रोप, मिरचीचे रोप, टमाटरचे रोप नष्ट झाले आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची तात्काळ चौकशी करावी व नुकसानभरपाई देण्यात यावी असे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, माजी सरपंच व शेतकरी कोठीराम पवनकर, राजकुमार भोपे, विश्वजीत क्षीरसागर, अरुण भेदे, विनोद भोपे, मोरेश्वर सेलोकर, प्रकाश भोपे, रुपचंद पवनकर या शेतकऱ्यांनी प्रकाश भोपे, मोरेश्वर सेलोकर, बंडू राघोर्ते, विनोद राघोर्ते, सुनील भेदे, केशो आस्वले, योगेश गायधने, राजेश चौधरी, जयंता आस्वले उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी