शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतीकडे मागितली इच्छामरणाची मागणी

By admin | Updated: February 7, 2016 01:19 IST

मागील १० वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वाहन चालक म्हणून २४ तास सेवा देत असून शासन स्तरावर आमच्या मागण्याकडे सतत सरकार दुर्लक्ष करीत आहे ....

पहेला : मागील १० वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वाहन चालक म्हणून २४ तास सेवा देत असून शासन स्तरावर आमच्या मागण्याकडे सतत सरकार दुर्लक्ष करीत आहे व आमच्या पदरी निराशाच पडत असल्याने शेवटी कंटाळून कंत्राटी वाहन चालक जितेंद्र डोंगरे यांनी इच्छामरणासाठी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विनंती केली आहे.सदर कंत्राटी वाहन चालक हा भंडारा जिल्ह्यातील व मोहाडी तालुक्यातील मोहगाव (देवी) येथील रहिवासी असून ते सन २००६ पासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कंत्राटी वाहन चालक व रोजंदारी तत्वावर कार्यरत आहे. सदर नियुक्ती रोजगार व स्वयंरोजगारच्या अंतर्गत करण्यात आली होती. तिथे दहा ते पंधरा लोकांची कमेटी नेमण्यात आली होती. त्यामध्ये गाडीची ट्रायल व पेपर आणि तोंडी परीक्षा घेऊन एकूण चालक या पदासाठी १७ लोकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये जितेंद्र डोंगरे हा वाहनचालक सुद्धा होता. त्यानंतर सदर वाहनचालकाची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्र दिघोरी (मोठी) येथे करण्यात आली. तेव्हा त्यांना फक्त २६५० रुपये एवढ्याशा मानधनावर २४ तास सेवा देणे बंधनकारक होते. तरीसुद्धा सदर वाहन चालक मुकाट्याने २४ तास सेवा देत होते.सन २००७ मध्ये डोंगरे यांची बदली प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे करण्यात आली. काही काळानंतर त्याला कार्यमुक्त करण्यात आले होते. नंतर आय.पी.एच.एस. मध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्यात वाहन चालक पदाकरिता वृत्तपत्रात जाहिरात दिली. त्यानुसार डोंगरे यांनी अर्ज केला. त्यानुसार डोंगरे यांनी अर्ज केला व त्यात त्याची पुन्हा निवड करण्यात आली. काही काळानंतर मे.बी. व्ही.जी.प्रा.लि. पुणे यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला तेव्हा त्यांचेकडे दोन वर्षे वाहन चालक या पदावर कार्यरत होते. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रोजंदारी या पदावर कार्यरत आहे. (वार्ताहर)