शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

By admin | Updated: February 20, 2015 00:31 IST

तीन भुखंडाला आकृषक करण्यास परवानगी देण्यासंबंधी मासिक व ग्रामसभेला विश्वासात घेतले गेलेले नाही. परस्पर ग्रामसेवकाने लेटर पॅडवर परवानगी दिली.

जवाहरनगर : तीन भुखंडाला आकृषक करण्यास परवानगी देण्यासंबंधी मासिक व ग्रामसभेला विश्वासात घेतले गेलेले नाही. परस्पर ग्रामसेवकाने लेटर पॅडवर परवानगी दिली. परिणामी गावाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणीचे खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून उपसरपंच मनोज गिऱ्हेपुंजे यांना दिलेल्या तक्रारीतून उपसरपंच मनोज गिऱ्हेपुंजे यांच्यासह तीन सदस्यांनी केली आहे.भंडारा तालुक्याच्या पश्चिम सिमेवर असलेली खरबी (नाका) ग्रामपंचायत अनेक समस्यांनी ग्रासलेली आहे. येथील सत्तारूढ सरपंच कमेटीवरील पायउताराचे प्रकरण तात्पुरते थांबत नाही. तोच आता ग्रामसेवकांविरूद्ध उपसरपंचाने सन २०१३ मधील तीन वर्षांचे प्रकरण पुढे करून चर्चेला उधाण आले आहे. यात उपसरपंच मनोज गिऱ्हेपुंजे, सदस्य वाल्मिक मोथरकर, सुनिल मोथरकर, लता गोस्वामी यांनी ग्रामसेवक विरूद्ध पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांना तक्रार दिली. यात साईनाथ एग्रो इंडस्ट्रीजला त्यांच्या मालकीच्या भुखंड क्रमांक ४३४-१, ४३५-१ व ४३५-२ वर साईस मिल, पॉवर प्लाँट आणि आईल मिल उभारण्याकरीता कृषक जमीन अकृषक करण्यासाठी मासिक सभेत ठरावानुसार कमेटीने परवानगी दिली होती. मात्र औद्योगिक प्रायोजनार्थ ग्रामपंचायत ठरावानुसार ८ मे २०१३ अन्वये भुखंड क्रमांक ४३३-१, ४३३-२ व ४३४-२ ला परवानगी देण्यात आलेली आहे, असे ग्रामसेवकाने लेटर पॅडवर १९ नोव्हेंबर २०१३ च्या परवानगी पत्रात नमूद केले आहे. गुलशन कुकूटपालन संस्थेकडील थकबाजी ग्रामसेवकानी दडवून ठेवली. अवेश लियाकत शेख यांनी पीव्हीसी गिट्टी व दाना बनवणे असा अर्ज करून ग्रामपंचायतला परवानगी मागितली होती. ग्रामपंचायत कमेटीने नकार दिला असताना सुद्धा ग्रामसेवकांनी कमेटीला विश्वासात न घेता अवेश शेख यांना कुठलाही मासिक सभेत ठराव मंजुर न करता सदर अर्जदाराला परस्पर नाहरकत प्रमाणपत्र दिले, असे काम करणाऱ्या ग्रामसेवक व अधिकारी यांच्या विरूद्ध कारवाई करण्याची मागणी खंडविकास अधिकारी यांच्याकडे उपसरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्याच्या सह्याद्वारे तक्रार अर्ज सादर करण्यात आले. या प्रकरणी ग्रामसेवक म्हणतात की, ठराव झालेला आहे. मात्र ठरावाची प्रत दाखवित नाही. (वार्ताहर)