शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘देवधान’ आले लोंबीवर

By admin | Updated: October 4, 2015 01:22 IST

पेरणीपासून मळणीपर्यंत बेभरवशाच्या धान शेतीत घडाई पेक्षा मडाईच अधिक आहे. जिवापाड निगराणी करुनही फारसे काही मिळत नाही.

निसर्गनिर्मित : देवतांदळाची अधिक मागणीराजू बांते  मोहाडीपेरणीपासून मळणीपर्यंत बेभरवशाच्या धान शेतीत घडाई पेक्षा मडाईच अधिक आहे. जिवापाड निगराणी करुनही फारसे काही मिळत नाही. अशातच पेरणी विना, रोवणीविना अन् खताशिवाय तयार होणारे निसर्गनिर्मित देवधान आता लोंबीवर आले आहे.खोलगट जागा, रिकामी व साचलेल्या पाण्यात नैसर्गिकरित्या देव धानाचे पिक तयार होते. या देवधानाला ग्रामीण भागात ‘परसोडी’ या नावाने ओळखले जाते. साधारणत: जिथे कमी/मध्यम प्रमाणात पाणी सिचिंत असने अशा ठिकाणी देवधानाचे पिक हमखास बघायला मिळते. सद्यास्थितीत देवधानाची पूर्णत: वाढ झाली आहे. देवधानाच्या लोंबी भरत आहेत. या महिन्याअखेर पर्यंत धानलोंबी परिपक्व होण सुरु होईल. देवधानाची लोंबी परिपक्व झाल्यानंतर विशेषत: ढिवर समाजातील बांधव व पांगुळ देवधानाची झाडपी करतात. या देवधानाला कापणीची पध्दत नाही विशेषत: पहाटेच्या वेळी धान झाडणी करणारे परडा व ताटीच्या साहाय्याने दररोज देवधानाची झाडणी केली जाते. तलाव, बोडी, जिथे पाण्याचा ओलावा टिकून आहे अशा ठिकाणी देवधानाचे पिके आलेली आहेत. वरठी- तुमसर रस्त्यावर प्लॉटींग केली गेली आहे. त्या ठिकाणी साधारणत: अर्धा एकरात देवधानाचे पिक डौल्लात उभे आहे. तसेच मोहाडीच्या चौडेश्वरी मंदिराच्या मार्गाने कान्हगावकडे जाणाऱ्या मोरगावच्या तलावात हे देवधान हमखास दिसून येत आहे. देवधानाचा वापर उपवासासाठी केला जातो. देवधानापासून ‘भगर’ तयार केली जाते. बाजारातील अन्य तांदळाच्या तुलनेत देवतांदळाची किंमत दुप्पट असते. देवधानाचे उत्पन्न कमी असल्याने तसेच निसर्ग निर्मित तांदुळ असल्याने या तांदळाची किंमत अधिक असते. ऋषीपंचमी, नवरात्रीला उपवास करणारे या देवतांदळाच्या भात बनवून खातात. विशिष्ट काळात मिळणारे दे देवतांदूळ वर्षभर उपलब्ध नसतात. स्वाभाविकच उपवासक साबुदान्याचा उपयोग करतात. तरी काही विशिष्ट व्यक्ती देवतांदूळ मिळव्यासाठी शोध लावतात व तेच घेणे पसंत करतात. दरवर्षी नवरात्रीत्सवाला मोहाडी तालुक्यात मोहाडी येथे चौडेश्वरी मंदिरात जवळील गायमुख नदीवर यात्रा भरते. या यात्रेत दूरवरुन भाविक येतात. स्नान करुन त्याच ठिकाणी स्वयंपाक करुन उपवास सोडतात. या स्वयंपाकात काही प्रमाणात देवतांदळाचा उपयोग केला जातो.